Next
दानवे यांच्याकडून कार्यकर्त्यांचे अभिनंदन
प्रेस रिलीज
Saturday, April 14 | 11:47 AM
15 0 0
Share this story

मुंबई : राज्यात सहा नगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने चार नगराध्यक्षपदे व सर्वाधिक पन्नास नगरसेवकपदे जिंकून पुन्हा पहिला क्रमांक मिळवला आहे. भाजपच्या यशाबद्दल प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी मतदारांचे आभार मानले व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

दानवे म्हणाले की, ‘राज्यात निवडणूक झालेल्या सहा नगरपालिकांपैकी जामनेर (जि. जळगाव), वैजापूर (जि. औरंगाबाद) व देवरूख (जि. रत्नागिरी) या तीन नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष विजयी झाले. त्यासोबत आजरा (जि. कोल्हापूर) येथे भाजप समर्थित ताराराणी आघाडीचा उमेदवार नगराध्यक्षपदी विजयी झाला. सहापैकी चार नगराध्यक्षपदे जिंकून भाजपाने निर्विवाद यश मिळवले आहे.

नगरसेवकपदाच्या बाबतीतही भाजपने प्रथम क्रमांक मिळवला आहे. सहा नगरपालिकांच्या एकूण ११६ नगरसेवक पदांपैकी भाजपने सर्वाधिक ५० जागा पक्षाच्या चिन्हावर जिंकल्या. त्याखेरीज आजरा नगरपालिकेत विजयी झालेल्या आघाडीच्या नऊ नगरसेवकांमध्ये भाजपचे कार्यकर्ते आहेत.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या कामगिरीवर जनता खुश आहे व त्यामुळेच पक्षाला निवडणुकीत यश मिळत आहे. राज्यात भाजप महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. पक्षाची विजयाची मालिका गुरुवारच्या निकालातही कायम राहिली आहे,’ असे दानवे यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link