Next
एचडीएफसी बँक रन फॉर हर
प्रेस रिलीज
Saturday, March 17, 2018 | 05:37 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘एचडीएफसी’ बँकेतर्फे पुण्यात १७ मार्च रोजी ‘एचडीएफसी बँक रन फॉर हर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजोपयोगी कार्यासाठी लोकांना एकत्र आणण्याकरिता बँकेने आखलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून, एचडीएफसी बँक रन फॉर हरच्या माध्यमातून महिला सबलीकरणाबाबत जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
 
एचडीएफसी बँक रन फॉर हर या उपक्रमाचे उद्घाटन पुण्यातील मगरपट्टा सिटी येथील एचडीएफसी बँकेचे महाराष्ट्र विभागाचे विभागीय प्रमुख राकेश कुमार रेलन यांच्या हस्ते करण्यात आले. महिला सबलीकरणासाठी प्रतिज्ञा घेत साधारण एक हजार आठशे पुणेकरांनी या उपक्रमात सहभाग घेतला. पाच किलोमीटर व दहा किलोमीटर असे या उपक्रमाचे दोन भाग करण्यात आले होते.
 
विविध उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय महिलांचे सबलीकरण करण्यास एचडीएफसी बँक कटीबद्ध आहे. या मोहिमेअंतर्गत आखण्यात आलेल्या ‘सस्टेनेबल लाइव्हलीहूड इनिशिएटिव्ह’ (एसएलआय) (शाश्वत जीवनमान उपक्रम) या उपक्रमातून, बँकेने भारतातल्या ८० लाखांहून अधिक महिलांचा विकास घडवून आणला आहे.
 
एचडीएफसी बँकेचे महाराष्ट्र विभागाचे विभागीय प्रमुख राकेश कुमार रेलन म्हणाले, ‘सामाजिकदृष्ट्या जबाबदार कॉर्पोरेट नागरिक म्हणून, महिलांचे सबलीकरण करण्याकरिता आम्ही कटीबद्ध आहोत. एचडीएफसी बँकेच्या रन फॉर हर या उपक्रमाच्या माध्यमातून, महिलांच्या सबलीकरणाबाबत जनजागृती निर्माण करणे, हे आमचे ध्येय असून, महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊन स्वावलंबी बनण्यासाठी प्रोत्साहन देणे, हादेखील आमचा उद्देश आहे. सार्वजनिक चर्चांमध्ये या विषयाला जागा मिळवून देणे, हाही या उपक्रमामागचा उद्देश होता.’

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link