Next
‘एमएएचई’तर्फे ‘एमए इन इकोसोफिकल अॅस्थेटिक्स’ अभ्यासक्रम
प्रेस रिलीज
Wednesday, April 24, 2019 | 05:50 PM
15 0 0
Share this article:

पुणे : मणिपाल अ‍ॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशनमधील (डीम्ड युनिव्हर्सिटी) गांधीयन सेंटर फॉर फिलॉसॉफिकल आर्टस् अँड सायन्सेस (जीसीपीएएस) या घटक विभागाने शैक्षणिक क्षेत्रात प्रथमच इकोसोफिकल अॅस्थेटिक्स विषयामध्ये मास्टर ऑफ आर्टस (एमए) अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा कोर्स एक ऑगस्ट २०१९पासून सुरू होणार आहे. 

अर्जदाराने विद्यापीठांच्या अटी पूर्ण केल्यानंतर अर्जदाराची वैयक्तिक किंवा टेलिफोनिक मुलाखत घेतली जाईल आणि त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल. या कोर्ससाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०१९ आहे. हा अभ्यासक्रम मुख्यतः इकोसोफिकल दृष्टिकोनातून कलात्मक पत्रकारिता यावर आधारलेला असेल. 

इकोसोफिकल हा पर्यावरणशास्त्र आणि तत्त्वज्ञान यांना एकत्र करणारा विषय असून, या अभ्यासक्रमामध्ये लेखन आणि इकोसोफि यांना जोडणार्‍या धाग्यावर लक्ष केंद्रित करून कला, नृत्य, साहित्य, नाटक, सिनेमा, चित्रकला आदी सर्व कला प्रकारांचे फिलॉसॉफिकल अ‍ॅप्रिसिएशन यांचा समावेश असेल.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search