Next
भात, पुलाव, बिर्याणी, रायती, स्नॅक्स (पारंपरिक)
BOI
Wednesday, October 25 | 04:01 PM
15 0 0
Share this story

नेहमीचे पदार्थ निराळ्या स्वरूपात नि निराळ्या स्वादात समोर आले, तर जेवणाची लज्जत वाढते. असे लज्जत वाढवणारे पदार्थ पाककलातज्ज्ञ जयश्री कुबेर यांनी या पुस्तकात सांगितले आहेत. पहिल्या पुस्तकात त्यांनी भाताच्या निरनिराळ्या पाककृती दिल्या आहेत. भात, भाताचे प्रकार, पुलाव, बिर्याणी हे सर्व व्हेज व नॉनव्हेज प्रकारात करायला शिकवले आहे.

दुसऱ्या पुस्तकात स्नॅक्सचे प्रकार सांगितले आहेत. वडे, सामोसे, कचोरी, करंज्या, चाट, इडली, आप्पे, डोसे, ढोकळा, पकोडे, पोहे, उपीट, सांजा असे पारंपरिक पदार्थ तयार करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या, तर ते अधिक चविष्ट बनतात. याचे उदाहरणच या पुस्तकातून त्यांनी घालून दिले आहे. याशिवाय शेवेचे प्रकार, चिवड्याचे प्रकार, मठरी, डाळ असे पदार्थही शिकायला मिळतात.

प्रकाशक : मेनका प्रकाशन
पाने : ७९
किंमत : ६० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)





 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
Most Popular
Most Commented

Select Language
Share Link