Next
‘ऑनर ७एक्स’ आता ‘मेड इन इंडिया’
प्रेस रिलीज
Saturday, February 03 | 03:11 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ऑनर या डिजिटल युगातील ग्राहकांसाठीच्या हुवेईच्या ई-ब्रँडने त्यांच्या ‘ऑनर ७ एक्स’ या अत्याधुनिक ब्लॉकबस्टर उत्पादनाची निर्मिती आता चेन्नई येथे सुरू केल्याची घोषणा केली. या उत्पादनाच्या निर्मितीसाठी चेन्नईतील श्रीपेरुंबुदूरच्या ‘फ्लेक्स’ या स्केच टू स्केल सोल्युशन पुरवठादार कंपनीशी ‘ऑनर’ने भागीदारी केली आहे.

सप्टेंबर २०१६मध्ये ‘फ्लेक्स इंडिया’शी भागीदारी करून ‘हुवेई ऑनर’ने उत्पादनास सुरुवात केली. या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेत सर्वप्रथम ‘होली थ्री’ या फोनची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर ‘ऑनर सहा एक्स’च्या उत्पादनामुळे या उत्पादन साखळीला आणखी वाव मिळाला. आता, बाजारपेठेत नुकत्याच दाखल झालेल्या ‘ऑनर ७एक्स’ या स्मार्टफोनच्या माध्यमातून ‘मेक इन इंडिया’ला आणखी गती प्राप्त होणार आहे.

भारतात सखोल गुंतवणूक करून गेल्या १८ वर्षांत कंपनीच्या प्रशिक्षण, व्यापाराचे स्थानिकीकरण आणि विकासासाठी भारताला सर्वांत मोठे केंद्र बनवण्याचा प्रयत्न करणारी हुवेई ही टेलिकॉम क्षेत्रातली पहिलीच कंपनी आहे. आपल्या भारतीय परिचालनात उत्पादन व संशोधन-विकास केंद्राची स्थापना व त्यात गुंतवणूक करून ‘ऑनर’ने आपले भारतातील स्थान अधिक बळकट केले आहे. आपल्या व्यापारवृद्धीमध्ये ‘ऑनर’ने संशोधनाला अधिक महत्त्व दिले असून, ‘ऑनर ७एक्स’सारख्या ग्राहकाभिमुख स्मार्टफोन्समध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक केली आहे.

‘भारतीयांची नवनवीन उत्पादनाची मागणी ऑनर आणि हुवेईकडून कायमच पूर्ण केली जाणार असून, अत्याधुनिक उत्पादन आणि स्थानिकीकरणासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी हुवेईच्या उत्पादन उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून, या माध्यमातून स्थानिक गुणवत्तेलाही चालना देण्यात येत आहे; तसेच, देशात हायटेक संशोधनविकास तज्ज्ञता आणि ज्ञान आणण्याचाही यामागे विचार आहे. हुवेईच्या भारतातल्या १८ वर्षांच्या प्रवासात स्मार्टफोनचे भारतातील उत्पादन हा एक मानाचा मापदंड असून बेस्टसेलर ‘ऑनर ७एक्स’चे उत्पादन हीदेखील आमच्यासाठी एक विशेष क्रांती आहे,’ असे हुवेई कंझ्युमर बिझनेस ग्रुपच्या विक्री विभागाचे उपाध्यक्ष पी. संजीव म्हणाले.

किफायतशीर किंमतीत उत्कृष्ट परफॉर्मन्स देणारा बजेट सेगमेंटमधला ‘ऑनर ७एक्स’ हा एक यशस्वी स्मार्टफोन आहे. अत्यंत फॅन्सी डिस्प्ले असलेल्या या आकर्षक स्मार्टफोनचा स्क्रीन आणि बॉडी रेशोही सर्वाधिक असून, याच्या स्लिक बॉडीमध्ये ५.९ इंची स्क्रीन सामावलेली आहे. एखाद्या कॅमेर्‍यातून काढलेल्या छायाचित्रांप्रमाणेच या स्मार्टफोनमधूनही ग्राहकांना सुस्पष्ट दृश्यानुभव घेता येतो.

‘ऑनर ७एक्स’ डिव्हाईसमध्ये १६एमपीचे ड्युएल लेन्स आणि दोन एमपीचा रिअर कॅमेरा देण्यात आला असून, याला फेज डिटेक्शन ऑटोफोकस आणि एलईडी फ्लॅश हे फीचर्स जोडण्यात आले आहेत. यातील विशेष फिल्टर्स आणि ‘इफेक्ट्स’ या फंक्शन्समुळे नवोदित छायाचित्रकारही उत्तम छायाचित्रांसह सोशल मिडिया गाजवू शकतो. ‘ऑनर ७एक्स’ला व्यावसायिक आय प्रोटेक्शन फीचर देण्यात आले असून याच्या मेटल बॉडीमध्ये बरीचशी वैशिष्ट्ये सामावलेली आहेत. याच्या अ‍ॅल्युमिनीयम चॅसीजवर २.५ डी ग्लास फेस बसवण्यात आला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link