Next
मासिक पाळीचे गैरसमज दूर करण्यासाठी ‘म्युरल’
BOI
Saturday, June 01, 2019 | 02:43 PM
15 0 0
Share this article:

गुवाहाटी : मासिक पाळीबाबत असलेले गैरसमज दूर करून, आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी गुवाहाटीत एक म्युरल (शिल्प) तयार करण्यात आले आहे. २८ मे रोजी झालेला ‘मेन्स्ट्रुअल हायजीन डे’ अर्थात मासिक पाळीतील आरोग्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी पाळल्या जाणाऱ्या दिवसाचे औचित्य साधून हे शिल्प तयार करण्यात आले आहे. समाजसेवा विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या बिदिशा सैकिया या मुलीच्या संकल्पनेतून हे म्युरल साकारले असून, तिने #BleedWithDignity या नावाने ऑनलाइन मोहीमही सुरू केली आहे. आसाममधील प्रत्येक शाळेत सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन उपलब्ध होण्यासाठी बिदिशा प्रयत्न करत आहे. 

पारिजात अकादमी या शाळेत हे म्युरल लावण्यात आले आहे. शिल्पकार नीलिमा महंता यांनी बिदिशाच्या कल्पनेप्रमाणे हे म्युरल प्रत्यक्षात उतरवले आहे. लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या फुलांची नक्षी आणि एका बाजूला ‘ब्लीड विथ डिग्निटी’ अशी अक्षरे रेखाटली आहेत. 

गुवाहाटी महानगरपालिकेचे आयुक्त देबेश्वर मालाकार यांच्या हस्ते या म्युरलचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी बोलताना ते म्हणाले, ‘आसाममधील अनेक मुली आजही सॅनिटरी पॅड्स मागायला लाजतात. शाळांमध्ये सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन ठेवले, तर मुलींना सहजपणे सॅनिटरी पॅड्स उपलब्ध होतील. मासिक पाळीदरम्यान त्यांना पॅड्सचा वापर करता येईल. त्यामुळे मासिक पाळीविषयी असलेली भीती, लाज, गैरसमजही दूर होतील. बस स्थानके, रेल्वे स्थानके अशा सार्वजनिक ठिकाणीही अशी मशीन्स लावणे गरजेचे आहे.’

आपल्या मोहिमेबाबत बिदिशा म्हणाली, ‘काही समाजांमध्ये मुलीला पहिल्यांदा पाळी आल्यानंतर त्याचा सोहळा केला जातो. माझ्या मोहिमेद्वारे मी मासिक पाळीबाबत असणारे सामाजिक गैरसमज, मुलींना त्याविषयी वाटणारी लाज, त्याबाबत मोकळेपणे बोलण्याची चोरी हे सगळे दूर करू इच्छिते. प्रत्येक मुलीला मासिक पाळीदरम्यान आरोग्यदायी वातावरण मिळाले पाहिजे यासाठी मी प्रयत्न करत आहे.’

२०१३मध्ये एका जर्मन संघटनेने २८ मे रोजी हा दिवस पाळायला सुरुवात केली. त्यानंतर जगभर हा दिवस पाळला जातो. 

हेही जरूर वाचा :
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Arvind K Kulkarni Pune38 About 82 Days ago
I am having some important things to throw light on this matter. Please give me opportunity to show you some demonstration with the help of Dowsing.. on which I am doing research for the last many years. My mobile number and WhatsApp no is...9890602178.
0
0

Select Language
Share Link
 
Search