Next
हिमायतनगरमधील सरसम येथे रस्त्याचे उद्घाटन
नागेश शिंदे
Monday, March 04, 2019 | 02:52 PM
15 0 0
Share this story



हिमायतनगर : हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या स्थानिक निधीतून सरसम येथील इंदिरानगरमध्ये सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.

एक मार्च २०१९ रोजी आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुकाप्रमुख राम ठाकरे यांनी भूषविले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून गजानन चायल उपस्थिती होते. हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथील इंदिरानगरच्या रहिवाशांनी मुख्य रस्त्यावर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची मागणी केली होती. रस्त्याची समस्या लक्षात घेऊन आमदार पाटील आष्टीकर यांनी इंदिरानगरअंतर्गत रस्ते नव्याने करण्याचा घेतला. त्या अनुषंगाने त्यांनी सरसम- इंदिरानगरसाठी चार लाखांचा निधी प्राप्त करून दिला.



आमदार आष्टीकर विधानसभा सभागृहातील कामकाजात व्यस्त असल्याने उद्घाटन कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष राठोड यांनी उपस्थिती लावली. या वेळी संतोष पुल्लेवार, साईनाथ धोबे, मारोती सूर्यवंशी, बालाजी मंडलवाड, अवधूत कदम, गजानन मिराशे, यदुराज मिराशे, प्रशांत मंडलवाड, सुभाष मिराशे, गुणाजी चव्हाण यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link