Next
आयुर्वेद इन ब्रेकफास्ट लंच अँड डिनर
BOI
Monday, November 05, 2018 | 09:59 AM
15 0 0
Share this article:

आजारी पडले की मग औषधोपचार करायचा, अशीच प्रत्येकाची मानसिकता असते. अशावेळी औषधांची सांगड आहारात केली तर? हा विचार करून डॉ. वैद्य शिल्पा कुलकर्णी (केसकर) यांनी ‘आयुर्वेद इन ब्रेकफास्ट, लंच अँड डिनर’ पुस्तकातून आयुर्वेदिक औषधींचे न्याहारी, जेवण यांच्यातील प्रयोग व प्रत्यक्षीकरण केले आहे.

वेगवेगळी द्रव्ये घालून केलेली सरबते अर्थात औषधी द्रव्ये पानीय कल्पनेत सांगितली आहेत. उदा. खजुरादि मन्थ, रास्नदाढिका, तंदूलोदक, षडंगपानीय, कोकम सरबत, साळीच्या लाह्यांचे पाणी आदी २९ पेयांची कृती व उपयोग दिले आहेत. दूध, दही, ताक यांच्यापासून तयार होणारी औषधी पेय, आयुर्वेदिक मसाले, आयुर्वेदिक शीतपेयांची माहिती यातून मिळते.

औषधी गुणांच्या मूत्र कल्पनेत गोमूत्राचे महत्त्व, अपायकारक विरुद्धान्न, साखर, गुळ, मीठ व क्षाराचे फायदे-तोटे, चूर्ण-चाटण-वटी, सूप, सॅलड, कोशिंबिरी, फळे लाडू-चिक्की, आयुर्वेदिक न्याहारीतील पदार्थ, भाज्या, सार-आमटी-कट, पोळी-रोटी-भाकरी, भात, औषधी तूप यांचा समावेश आहे. इतकेच नाही, तर आयुर्वेदिक लोणची व आइस्क्रीममधील घटकांची माहितीही आहे.             
      
प्रकाशन : शिल्पा कुलकर्णी
पृष्ठे : ७४
मूल्य : १५० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search