Next
प्लास्टिक निर्मूलनासाठी शाळकरी मुलांचा उपक्रम
BOI
Saturday, June 30, 2018 | 06:13 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी शनिवारी (३० जून) रोजी गावागावांतील प्लास्टिक वेचून त्याचे निर्मूलन केले. 

सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शनिवारी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना पर्यावरणाच्या संदर्भात जनजागृती करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक शाळांनी यात सहभाग नोंदवला होता. गावोगावच्या शाळांनी या उपक्रमात सहभाग नोंदवल्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गाव स्वच्छ व सुंदर बनलं होतं. केवळ एका दिवसापुरती का होईना, पण गावे स्वच्छ व सुंदर बनल्यामुळे आपले गाव व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी गावातील विद्यार्थी व ग्रामस्थ भविष्यात नक्कीच पुढाकार घेतील. 

रोपळे बुद्रुक गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पंढरपूर तालुक्यात गुणवत्तेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर राहिली आहे. विद्यार्थ्यांची केवळ गुणात्मक वाढ न करता त्यांना सामाजिकदृष्ट्या उपयुक्त व देशहिताच्या गोष्टींचे धडे देण्याकडे या शाळेचा नेहमीच कल राहिला आहे. 

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार पर्यावरण जनजागृतीसाठी शनिवारी या शाळेतील मुलांनी गावातून प्रभातफेरी काढली. त्या वेळी विद्यार्थ्यांनी गावात फिरून गल्लीबोळातील घनकचरा वेचला. वेफर्सचे पाऊच, पाण्याच्या बाटल्या, कॅरीबॅग्ज व रिकाम्या टूथपेस्ट व ब्रश या कचऱ्यात आढळून आले. सुमारे साडेतीन ते चार क्विंटल कचरा मिळाला असल्याचे शिक्षक अरुण लोखंडे यांनी सांगितले. इयत्ता दुसरी ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला होता. 

स्वच्छ रोपळे... सुंदर रोपळे, स्वच्छ गाव... सुंदर शाळा, प्लास्टिकचा वापर बंद करा, पर्यावरण वाचवा, देश वाचवा, अशा घोषणा या वेळी विद्यार्थ्यांनी दिल्या. मुख्याध्यापक सुनील शिंदे व शिक्षकवर्ग आणि ग्रामस्थांनी या प्रभात फेरीत सहभाग नोंदवून आपला गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रयत्न केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link