Next
‘लेक माझी लाडकी’ने घेतले रंजक वळण
प्रेस रिलीज
Friday, July 13, 2018 | 12:43 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘स्टार प्रवाह’वर सुरू असलेली लोकप्रिय मालिका ‘लेक माझी लाडकी’ ही एका रंजक वळणावर येऊन थांबली आहे. या मालिकेत ऋषिकेशच्या कटकारस्थानांना तोंड देता देता मीरा हतबल झाली आहे. ऋषिकेशकडे दिलेले सानिकाचे बाळ मीरा परत आणू शकेल का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

‘लेक माझी लाडकी’ ही मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० ‘स्टार प्रवाह’वर प्रसारित केली जाते. या मालिकेतील ऋषिकेशच्या डावपेचांना बळी पडल्यामुळे मीरा सानिकाचे बाळ ऋषिकेशच्या हाती सोपवते; मात्र त्या बाळाचे अपहरण होते. या प्रकारानंतर संपूर्ण कुटुंबाकडून मीराला प्रश्न विचारले जातात; मात्र मीराकडे याचे काहीच उत्तर नसते. ऋषिकेशकडे दिलेले बाळ परत आणणे एवढेच तिच्या हाती राहिले आहे.

आता ऋषिकेशकडे असलेले बाळ मीरा परत आणू शकेल का, त्यासाठी तिला काय करावे लागेल, अशा प्रश्नांची उत्तरे पुढील भागांतून मिळणार असून प्रेक्षकांमध्ये याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search