Next
‘रोपळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समस्या मार्गी लावू’
BOI
Tuesday, September 11 | 12:58 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : ‘रोपळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरणे, ग्रामपंचायतीच्या १४व्या वित्त आयोगातून आरोग्य केंद्रांना औषधे मिळवून देणे आणि उपकेंद्र दुरुस्तीसाठी निधी मंजूर करणे ही कामे लवकरच मार्गी लावू’ असे आश्वासन जिल्हा परिषद सदस्य अतुल खरात यांनी दिले.  

पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्ण कल्याण समिती व नियामक मंडळाची बैठक जिल्हा परिषद सदस्य खरात यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी पंचायत समिती सदस्या अर्चना पाटोळे, रोपळेचे सरपंच दिनकर कदम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जयवंत बोधले, रुग्ण कल्याण सल्लागार समितीचे सदस्य महादेव साळुंखे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयकुमार सरडे उपस्थित होते.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका केवळ खराब चाकांमुळे बसून आहे. गाडीच्या चालक, डिझेलसाठी तरतूद आहे; मात्र चाकांसाठी निधीची तरतूद नसल्यामुळे या रुग्णवाहिकेची ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी अवस्था झाली आहे. या गाडीचे टायर बदलण्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे खरात यांनी सांगितले.

डॉ. बोधले म्हणाले, ‘आरोग्य केंद्रांना औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. इतर आवश्यक वस्तू दानशूर व्यक्ती आणि ग्रामपंचायतीने दान केल्यास केंद्राचे बरेच प्रश्न सुटू शकतात.’

या बैठकीला मोहन ढोणे, शिवाजी चिखलकर, बबन साळुंखे, संगय्या हिरेमठ, एम. एन. सुतार, मिलिंद गणपुले, अरविंद बागल यांच्यासह केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Datta Bhosale ropale About 123 Days ago
kharat saheb adhar 1 ropalekar
0
0

Select Language
Share Link