Next
मेट्रोपोलीस हेल्थकेअर आणि नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनचा करार
प्रेस रिलीज
Wednesday, March 21, 2018 | 05:19 PM
15 0 0
Share this story

मेट्रोपोलीस हेल्थकेअर आणि नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या करारप्रसंगी  डॉ. नरेश गोएल, नीलेश शहा व डॉ. सुशील शहा
मुंबई :  ‘देशातील पाचशे २५ अँटीरेट्रोवायरल थेरपी (एआरटी) केंद्रात येणाऱ्या रूग्णांसाठी एचआयव्ही वायरस लोड टेस्टींग’साठी नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (NACO)  यांच्यातर्फे मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेडला करारबद्ध करण्यात आले आहे. यामुळे देशभरातील एचआयव्ही उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या आयुष्यात परिवर्तन येण्यास मदत होईल’, अशी माहिती  नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनचे (NACO)  डेप्युटी डायरेक्टर जनरल डॉ. नरेश गोएल यांनी दिली.  

ते म्हणाले, ‘आम्ही पहिल्यांदाच  वायरस लोड टेस्टिंग एक नियमित चाचणी (रुटीन टेस्ट) प्रमाणे करतो आहोत. मेट्रोपोलीस या कामात आमचा भागीदार बनला याबद्दल अतिशय आनंद वाटतो. एड्स नियंत्रण कार्यक्रमात नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या  (NACO)  मॉडेलने मोठी विश्वासार्हता मिळवली आहे. त्यामुळे रोगाचा प्रभाव  कमी झालेला दिसतो. वर्ष दोन हजारमध्ये हा प्रभाव सदुसष्ट टक्के होता, २००७मध्ये एचआयव्हीने जीव गमावणाऱ्यांची संख्या चोपन्न टक्के इतकी होती. २०३० पर्यंत एड्स निपटून काढण्याच्या आमच्या उद्दिष्टात वायरस लोड टेस्टींग हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी  नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (NACO)  आणि मेट्रोपोलीसची टीम सज्ज झाली आहे. या प्रक्रियेत वापरण्यात येणारे किट्स युएस एफडीए संमत, आयव्हीडी आणि सीई संमत असून ते रोशेद्वारे पुरविण्यात येत आहेत.’
 
मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेडचे संस्थापक- अध्यक्ष  डॉ. सुशील शहा  म्हणाले, ‘आमच्याकरिता हा क्षण अभिमानाचा आहे. कारण १९८५मध्ये एचआयव्ही टेस्टींग  सुरू करणारी मेट्रोपोलीस ही पहिली लॅब होती. आमच्याकडे २००५ पासून एचआयव्ही वायरस लोड टेस्टींग केले जात  आहे. दर्जा आणि अनुभवाच्या बाबतीत आम्हाला मोठा फायदा झाला. आम्हाला विश्वास वाटतो की, या भागीदारीसोबत एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या आयुष्यात आम्हाला सकारात्मक प्रभाव पाडता येईल.’
 
या भागीदारीविषयी बोलताना प्रवर्तक आणि व्यवस्थापकीय संचालक अमीरा शहा म्हणाल्या, ‘एचआयव्ही बाधितांच्या आयुष्यात बदल घडावा म्हणून सरकार प्रयत्नशील आहे हे पाहताना अतिशय प्रेरणा मिळते. आमच्या रिपोर्ट्समुळे  परिणाम होतो याचा आनंद वाटतो. नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनला (NACO)  तज्ज्ञ टीम, रिपोर्ट दर्जा, वेळेवर सेवा पुरवणे आणि मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्यासाठी सुविधा पुरवताना मेट्रोपोलीस संपूर्णपणे सुसज्ज आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link