Next
गांधीजींच्या दुर्मिळ छायाचित्रांचे पुण्यात प्रदर्शन
प्रेस रिलीज
Monday, October 01, 2018 | 02:52 PM
15 0 0
Share this story

पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे घेण्यात येणाऱ्या गांधी सप्ताहानिमित्त महात्मा गांधीजींच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन एक ते तीन ऑक्टोबर या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिर येथील कलादालनात होणार आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन एक ऑक्टोबरला महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त अभय छाजेड यांच्या हस्ते करण्यात आले. गांधीजींच्या बालपण, जीवनप्रवासाचे, जीवन संघर्षाचे छायाचित्र रूपदर्शन या प्रदर्शनातून पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. सर्व छायाचित्रे कृष्णधवल असून, त्यात गांधीजींच्या प्रारंभीच्या काळापासून, विविध चळवळी, दांडीयात्रा, असहकार चळवळ ते हत्येपर्यंतच्या प्रसंगांच्या छायाचित्रांचा समावेश आहे.

हे प्रदर्शन एक ते तीन ऑक्टोबरदरम्यान कला दालन, बालगंधर्व रंगमंदिर, येथे सकाळी १० ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत, तर चार ते सात ऑक्टोबरदरम्यान गांधीभवन, कोथरूड येथे सकाळी १० ते रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहील.

‘गांधीजींच्या जवळपास ४५० दुर्मिळ छायाचित्रातून महत्त्वाच्या काही छायाचित्रांची निवड केली आहे. पुढे हे गांधी विचारप्रेमी संस्थांना राज्यभर उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचा मानस आहे,’ असे या प्रदर्शनाचे संयोजक नितीन शास्त्री यांनी सांगितले.

ही छायाचित्रे मिळवण्यासाठी विविध संस्था आणि व्यक्ती यांचे सहकार्य लाभले. गेली २० वर्षे यावर संशोधन सुरू होते.

प्रदर्शनाविषयी :
कालावधी :
एक ते तीन ऑक्टोबर २०१८
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत
स्थळ : कला दालन, बालगंधर्व रंगमंदिर, पुणे.
कालावधी : चार ते सात ऑक्टोबर २०१८
वेळ : सकाळी १० ते रात्री आठ वाजेपर्यंत
स्थळ : गांधीभवन, कोथरूड, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link