Next
जनकल्याण ब्लड बँकेतर्फे पुण्यात परिषदेचे आयोजन
प्रेस रिलीज
Friday, June 14, 2019 | 11:44 AM
15 0 0
Share this article:

डावीकडून डॉ. संदीप सेवलीकर, डॉ. अतुल कुलकर्णी आणि डॉ. श्रवण सुब्रमण्यम.

पुणे : जागतिक रक्तदाता दिनाचे (१४ जून) औचित्य साधून रुग्णांना सुरक्षित रक्त उपलब्ध होण्याचे महत्त्व स्पष्ट होण्यासाठी, जनकल्याण ब्लड बँकेने शहरात गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. ट्रान्सफ्युजन ट्रान्समिटेड इन्फेक्शन्सचा (टीटीआय) संसर्ग झाल्यास त्यांच्या उपचारासाठी येणाऱ्या खर्चामुळे आरोग्य यंत्रणेवर लक्षणीय ताण येतो, याबद्दल जागृती करण्याबाबतही परिषदेत सविस्तर चर्चा करण्यात आली. 

जनकल्याण ब्लड बँकेचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी, रॉश डायग्नॉस्टिक्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रवण सुब्रमण्यम व रॉश डायग्नॉस्टिक्स इंडियाचे मेडिकल व सायण्टिफिक अफेअर्स हेड डॉ. संदीप सेवलीकर यांनी संवाद साधताना सुरक्षित ब्लड ट्रान्सफ्युजनवर चर्चा केली. महाराष्ट्रातील सर्व ब्लड बँकांमध्ये एनएटी टेस्टिंगसारख्या आधुनिक रक्त तपासणी पद्धती अवलंबण्यावरही भर देण्यात आला. भारतात अंदाजे अडीच हजार ब्लड बँक आहेत व त्यातील केवळ दोन ते तीन टक्के एनएटी टेस्टिंग करतात. देशातील व राज्यातील अनेक रुग्णालये/ब्लड बँक यांनी एनएटी तपासणी प्रक्रिया राबवलेली नाही.

या वेळी बोलताना डॉ. सेवलीकर म्हणाले, ‘दान केलेल्या रक्तातील संसर्ग शोधण्यासाठी ही सर्वांत संवेदनशील पद्धत आहे आणि ती सध्या जगभर उपलब्ध आहे. त्यामुळे विंडो पिरीयड (जेव्हा रुग्णाला संसर्ग होतो व जेव्हा चाचणी सकारात्मक निकाल दाखवते यादरम्यानचा कालावधी) कमी केला जातो. ‘एनएटी’साठी विंडो पिरीयड कमी असल्याचे विचारात घेता, एनएटी-टेस्टेड रक्त मिळालेल्या रुग्णांमध्ये ‘टीटीआय’चे प्रमाण कमी होऊ शकते.’

डॉ. कुलकर्णी म्हणाले, ‘ब्लड ट्रान्सफ्युजन हा इमर्जन्सी मेडिकल केअरचा महत्त्वाचा घटक आहे. इमर्जन्सीच्या वेळी पुरेसा रक्तपुरवठा होण्यासाठी सुनियोजित ब्लड ट्रान्सफ्युजन सेवेची गरज असते. यासाठी हे संपूर्ण क्षेत्र व विनामूल्य ऐच्छिक रक्तदानाची तयारी असणारे डोनर यांच्या वर्षभरातील सहयोगामुळेच हे केवळ शक्य होऊ शकते. सर्वांना सर्वंकष आरोग्यसेवा द्यायची असले तर प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित व दर्जेदार रक्ताचा पुरवठा होणे गरजेचे असते. जनकल्याणमध्ये आम्ही एनएटी टेस्टिंगमुळे ७० महिन्यांत १११ जणांचे आयुष्य ‘टीटीआय’पासून वाचवू शकलो, ही समाधानाची बाब आहे.’

डॉ. सुब्रमण्यम म्हणाले, ‘सुरक्षित व सहज उपलब्ध होईल असे रक्त व रक्तविषयक उत्पादने पुरवू शकतील अशा सुसंयोजित ब्लड ट्रान्सफ्युजन सर्व्हिसचा (बीटीएस) प्रभावी क्लिनिकल वापर करणे सर्वप्रथम गरजेचे आहे. रॉशमध्ये आम्ही ‘टीटीआय’च्या संसर्गाच्या दृष्टीने, जगभर स्वीकारले जाणारे एनएटी टेस्टिंग भारतातील रुग्णांसाठीही उपलब्ध झाले पाहिजे, हे ओळखले आहे. जगभर २० टक्के देशांनी एनएटी टेस्टिंग सक्तीचे केले आहे. सक्षम डायग्नॉस्टिक्समुळे आपल्याला सुरक्षित रक्तपुरवठा करून सुरक्षित केले जाते व यामुळे रुग्णांना त्यांच्या अन्य आजारांवर उपचार करण्यावर लक्ष केंद्रित करता येते.’

ब्लड ट्रान्सफ्युजन हा रुग्ण व्यवस्थापनातील महत्त्वाचा पैलू आहे. ब्लड ट्रान्सफ्युजन ब्लड ट्रान्सफ्युजनमधील गुंतागुंतीमुळे एचआयव्ही, हिपेटायटिस बी (एचबीव्ही) व हिपेटायटिस सी (एचसीव्ही) अशा ‘टीटीआय’ची लागण होऊ शकते.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search