Next
भगवान श्रीकृष्ण
BOI
Monday, July 22, 2019 | 10:26 AM
15 0 0
Share this article:

विष्णूचा मानवधारी अवतार म्हणजे श्रीकृष्ण, असे मानले जाते. या अवताराची मोहिनी व कृष्णाच्या व्यक्तिमत्त्वाची छाप आजही भारतीयांवर आहे. यशस्वी मुत्सद्दी, विजयी योद्धा, धर्मसाम्राज्याचा निर्माता शाश्वत जीवनमूल्य, तत्त्वज्ञानाचा महान द्रष्टा, अशा अनेक विशेषणांनी श्रीकृष्ण चरित्र भरलेले आहे, अशी ओळख नागपूर येथील विद्वान साहित्यिक साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांनी १९५२मध्ये कृष्णावरील एका व्याख्यानमालेत करून दिली होती. ही व्याख्याने ‘भगवान श्रीकृष्ण’ या ग्रंथरूपातून प्रकाशित केली आहेत. 

कृष्णाच्या चरित्रातील गूढत्त्व, धर्मस्थापनेचे कार्य, त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन, टीकाकारांची टीका, अहिंसावादी व कम्युनिस्टांच्या चष्म्यातून श्रीकृष्णाचा उपदेश व त्यांच्या अपेक्षांचे विवेचन यात केले आहे. कृष्णाचा ईश्वरी अवतार, त्याचे प्रयोजन व फलित कथन करतानाच कृष्णजन्मापूर्वीचा इतिहास, श्रीकृष्णाचे बालपण, जरासंधाशी लढा, रुक्मिणी स्वयंवर, पांडवांशी झालेली ओळख व त्यांच्या मदतीने केलेली धर्मस्थापना, श्रीकृष्णाचे अभिजात नेतृत्त्व, आदर्श सांगताना महाभारतातील कथांचा उल्लेख यात आहे.

पुस्तक : भगवान श्रीकृष्ण
लेखक : साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास
प्रकाशक : लाखे प्रकाशन
पाने : ४८० 
किंमत : ६५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search