Next
‘पालिका कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोगाचा फरक द्या’
माजी उपमहापौर आबा बागुल यांची मागणी
प्रेस रिलीज
Tuesday, December 04 | 03:20 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी एक जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी,’ अशी मागणी माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

यासंदर्भात बागुल यांच्याकडून आयुक्त सौरभ राव यांना निवेदन देण्यात आले आहे. यात म्हटले आहे, ‘सध्या  महागाईच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार फरकाची रक्कम देण्याची गरज आहे. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा न करता त्यांना केंद्र सरकारच्या धोरणानुसार रोख स्वरूपात कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात अदा करणे आवश्यक आहे. सध्याच्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे. यासंदर्भात तातडीने कार्यवाही करून कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी पहिली महापालिका म्हणून आपण अग्रेसर राहिले पाहिजे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link