Next
‘मेगा क्लस्टरबाबतच्या सर्व समस्या सोडवणार’
BOI
Monday, May 21, 2018 | 02:54 PM
15 0 0
Share this article:

सोलापूर : ‘सोलापुरात मंजूर झालेल्या मेगा क्लस्टरसाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यास तयार असून, वस्त्रोद्योग उद्योजकांच्या सर्व समस्या सोडवण्याला प्राधान्य देणार आहे. त्याचबरोबर आपली बलस्थाने वापरून वस्त्रोद्योग व्यवसायाला पुनर्वैभव प्राप्त करून देणार,’ असे आश्वासन  सहकार तथा वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.

पॉवरलूम टेक्स्टाईल मेगा क्लस्टरसंदर्भात १९ मे रोजी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश गोस्की, उपाध्यक्ष श्रीनिवास बुरा, सचिव संजय मडूर, खजिनदार गोवर्धन चाटला, सदस्य जयंत आकेन, गोविंद बुरा, राजेंद्र अंबळढगे, गोविंद झंवर आदी उपस्थित होते.

‘सोलापुरातील वस्त्रोद्योग म्हणजेच टॉवेल आणि चादर उत्पादकांच्या व्यवसायवाढीसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत. तरूण उद्योजकांना या व्यवसायाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे. उद्योजकांनी त्यांच्या व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञान तसेच मार्केटिंगचा योग्य वापर करावा, आपल्या वस्त्रोद्योग मंत्रीपदाच्या कार्यकाळात चादर व टॉवेल उत्पादकांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली जाईल,’ असे देशमुख यांनी सांगितले.

या वेळी मेगा क्लस्टरसाठी चिंचोळी एमआयडीसी येथील जागा उपलब्धता, आंतरराष्ट्रीय वस्त्रोद्योग महोत्सव, व्यवसायासाठी लागणारे मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम, अक्कलकोट एमआयडीसी येथील समस्या, व्यापारी संकुल, ड्राय पोर्ट आदी बाबींवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

‘अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये स्वच्छता राखली जात नाही; तसेच झाडांचे प्रमाण कमी असल्यामुळे त्या ठिकाणी ओसाड वाटते. यामुळे सर्व उद्योजकांनी परिसरात स्वच्छता मोहीम तसेच वृक्षारोपण चळवळ सुरू केली पाहिजे. त्यानंतरच येथील स्थिती बदलण्यास मदत होईल. या मोहिमेसाठी आपण आवर्जून उपस्थित राहू,’ अशी सूचना देशमुख यांनी उपस्थित उद्योजकांना केली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search