Next
‘चड्डी’, ‘फंटूश’ शब्द आता ऑक्सफर्ड शब्दकोशात
BOI
Friday, March 22, 2019 | 04:19 PM
15 0 0
Share this article:


नवी दिल्ली : ऑक्सफर्ड या जगप्रसिद्ध इंग्रजी शब्दकोशामध्ये आता ‘चड्डी’ आणि ‘फंटूश’ या भारतीय शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. ‘फंटूश’ हा मूळ स्कॉटिश शब्द असला, तरीही भारतातही तो प्रचलित आहे. ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशात समाविष्ट करण्यात येणाऱ्या नवीन ६५० शब्दांमध्ये या शब्दांचाही अंतर्भाव आहे. 

ऑक्सफर्ड शब्दकोशाच्या पहिल्या आवृत्तीला यंदा ९० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त लोकांना नव्या शब्दांबद्दल मदत करण्याचे आवाहन ऑक्सफर्ड शब्दकोशातर्फे करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत लोकांनी अनेक शब्द सुचवले होते. त्यातील अत्यंत प्रचलित शब्दांचा समावेश ‘ऑक्सफर्ड’मध्ये करण्यात आला आहे.

आत्तापर्यंत भारतातील अनेक प्रचलित शब्द या डिक्शनरीमध्ये घेण्यात आले आहेत. त्यात आता या दोन नवीन शब्दांचीही भर पडली आहे. यापूर्वी इंग्रजी ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये शॉर्ट ट्राऊझर्स, शॉर्टस् या शब्दांसह अंडरविअर, अंडरपँट या शब्दांचा वापर करण्यात आला होता. आता हिंदी आणि मराठी भाषेत प्रचलित असलेल्या ‘चड्डी’ या शब्दाचा उल्लेख करण्यात आला आहे. ‘फंटूश’ हा शब्द दिखाऊ, भडकाऊ अशा अर्थाने वापरण्यात आला आहे.

लोकांकडून स्कॉटिश शब्ददेखील मोठ्या प्रमाणात सुचविण्यात आले. त्यापैकी बिडी-इन, सिटूटेरी यांचा समावेश शब्दकोशात करण्यात आला आहे. ‘बिडी-इन’चा अर्थ शब्दकोशात विवाहबाहय़ संबंध बाळगणे असा देण्यात आला आहे, तर सिटूटेरी या स्कॉटिश शब्दाचा अर्थ बाहेर बसणे किंवा उन्हात बसणे असा होतो.

वेल्श इंग्रजीचा शब्द जिबॉन्स म्हणजेच कांदा आणि न्यू ऑरलियन्सच्या याट जिबॉन्स यासारखे शब्दही सुचविण्यात आले. त्यांनाही ऑक्सफर्ड शब्दकोशात स्थान मिळाले आहे.

‘आम्ही प्रादेशिक शब्दांचा शोध घेतच राहणार असून, भविष्यात आणखी नवे शब्द जोडणार आहोत,’ असे ऑक्सफोर्ड शब्दकोशाचे पदाधिकारी जोनाथन डेंट यांनी म्हटले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search