Next
‘पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिक ज्ञान आवश्यक’
प्रेस रिलीज
Saturday, June 23, 2018 | 03:01 PM
15 0 0
Share this story

विद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन करताना डाव्या बाजूने देवेश जतिया, सी. पी. त्रिपाठी, अक्षय दुगर, चेतन तुपे.पुणे : ‘दैनंदिन आयुष्य जगत असताना विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रात्यक्षिक ज्ञान उपयोगी पडत असते. प्रात्यक्षिक ज्ञानामुळे विद्यार्थ्यांना जगाची माहिती अधिक मिळते आणि हीच माहिती त्यांना जीवन जगण्यास उपयुक्त ठरते. त्यामुळे पुस्तकी ज्ञानासोबतच प्रात्यक्षिक ज्ञान विद्यार्थ्यांना देणे अधिक आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन बजाज ऑटोच्या सीएसआर विभागाचे सल्लागार सी. पी. त्रिपाठी यांनी व्यक्त केली.

पुणे राउंड टेबल १५, बजाज ऑटो आणि साने गुरुजी शिक्षण संस्था यांच्या विद्यमाने वडकी येथील नूतन माध्यमिक विद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन  त्रिपाठी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी ‘पुणे राउंड टेबल’चे अध्यक्ष देवेश जतिया, विरोधी पक्षनेते व साने गुरुजी शिक्षण संस्थाचे अध्यक्ष चेतन तुपे, राउंड टेबल इंडिया राष्ट्रीय खजिनदार अक्षय दुगर, राउंड टेबल इंडियाचे राष्ट्रीय समन्वयक मोर्य फिलीप, सरपंच, मुख्याध्यापक व समस्त शिक्षक उपस्थित होते.  

वडकी येथील नूतन माध्यमिक विद्यालयाच्या सात वर्गांचे नूतनीकरण आणि चार नवीन वर्ग तयार करण्यात आले आहेत. याचा फायदा २००हून अधिक मुलांना होणार आहे. राउंड टेबल इंडिया या स्वयंसेवी संस्थेने संपूर्ण देशभरात दोन हजारांहून अधिक शाळांमध्ये पाच हजारांहून अधिक वर्गखोल्यांची निर्मिती केली आहे.  

‘शाळेत मिळालेल्या या ज्ञानाच्या आधारे ते नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्यातून समाजात नवे परिवर्तन घडवून आणू शकतील. शिक्षणाची गंगोत्री गावोगाव पोहचवून देशाच्या विकासात आम्हीही खारीचा वाटा उचलू,’ असे त्रिपाठी यांनी नमूद केले.

‘पुणे राउंड टेबल’चे अध्यक्ष जातिया म्हणाले, ‘प्रत्येक मुलाला शिक्षण मिळवण्याचा अधिकार आहे. त्यामुळेच आपल्या देशाचे भविष्य घडवणाऱ्या या पिढीला ते मिळवून देणे आमचे कर्तव्य आहे. राउंड टेबल इंडियाच्या ‘शिक्षणाच्या माध्यमातून स्वातंत्र्य’ (Freedom Through Education) या संकल्पनेअंतर्गत ज्या शाळांना पायाभूत सुविधा, ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, पुस्तके, स्टेशनरी असे जे काही आवश्यक आहे ते देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी अधिकाधिक लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे. यामुळे जास्तीत जास्त मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता येणे शक्य होईल.’

‘ग्रामीण भागातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे हे आमच्या संस्थेचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून या मुलांना आधुनिक जगाशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून करत आहोत,’ असे तुपे यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link