Next
‘टीमलीज’तर्फे संवादात्मक चर्चासत्र
प्रेस रिलीज
Friday, September 14, 2018 | 02:31 PM
15 0 0
Share this article:

पुणे : टीमलीज सर्व्हिसेस कम्पोझिट स्टाफिंग कंपनीने ‘क्रिएटिंग व्हॅल्यू चेन इन एचआर– न्यू एज हायरिंग आउटलूक’ याविषयी नुकतेच संवादात्मक चर्चासत्र आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी विविध उद्योगांतील व क्षेत्रांतील दिग्गज उपस्थित होते. या कार्यक्रमाचा भर नियुक्तीच्या आधुनिक पद्धती, वैविध्य यावर व विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी वाढवण्यावर होता.   

साउथ कं. इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश जॉन यांनी प्रमुख भाषण केले. कल्याणी स्टुडिओचे संस्थापक व अध्यक्ष विराज कल्याणी, कर्टिस राइटचे व्यवस्थापकीय संचालक राजेश ढेकणे, इमर्सन इनोव्हेशन सेंटरच्या एचआर संचालक रिणिता लासकर, रॉबर्टशॉ कंट्रोल्स व पायल एस.चे बिझनेस हेड जितेंद्र मांगले यांचा पॅनलमध्ये सहभागी होते.

एचआर इंटिग्रेशनमुळे व्यवसाय व एन्टरप्रायजेस यांच्यावर कशाप्रकारे लक्षणीय परिणाम होतो, यावरही या सत्रामध्ये भर देण्यात आला. या कार्यक्रमामध्ये आधुनिक नियुक्तीबद्दल आउटलूक ट्रेंड्स, गुणवान व्यक्तींची नियुक्ती, त्यांना आकृष्ट करणे व टिकवणे, वैविध्यपूर्ण नियुक्ती– संधी वि. आव्हाने व तरुणांच्या अपेक्षा– नोकरीच्या संधी व कामाची संस्कृती यांचे भविष्य अशा विषयांवर चार परिसंवाद घेण्यात आले..

कार्यक्रमाच्या यशस्वितेविषयी बोलताना, इंजिनीअरिंग व उत्पादनच्या हेड रिक्रुटमेंट्स मुनिरा लोलिवाला म्हणाल्या, ‘हा कार्यक्रम यशस्वी झाला, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. नियुक्तीच्या सध्याच्या पद्धती व भविष्यातील ट्रेंड यावर चर्चा करण्यासाठी आम्ही विविध उद्योगांतील दिग्गजांना एकत्र आणू शकलो, याचा आम्हाला आनंद आहे. विविध क्षेत्रांतील उदयोन्मुख ट्रेंडचे विश्लेषण करणे, तसेच नियुक्तीची प्रक्रिया आकांक्षा व उद्दिष्ट्ये या बाबतीत अधिक सुरळित, पारदर्शक, आकर्षक होण्यावर मंथन करणे, हे चर्चेचे मुख्य उद्दिष्ट होते.’

भारतातील नियुक्ती व लोकांची संस्कृती या संदर्भातील आउटलूकविषयीही चर्चा करण्यात आली. गेल्या १० वर्षांमध्ये एचआरमधील टर्मिनॉलॉजीज एचआर समन्वयापासून एचआर बिझनेस भागीदारीपर्यंत कशा विकसित झाल्या आहेत, त्यावरही चर्चा झाली.

‘भारतात व विशेषत: इंजिनीअरिंग व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये प्रचंड क्षमता आहे आणि निर्यात करण्याऐवजी देशातच तंत्रज्ञान विकसित करणे ही काळाची गरज आहे. यामुळे आम्हाला रोजगारनिर्मितीच्या संधी निर्माण करणे, नोकऱ्या सोडण्याचे प्रमाण कमी करणे व कौशल्यातील तफावतीचे आव्हान पेलणे शक्य होईल,’ असे लोलिवाला यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षपद सॅनी हेव्ही इंडस्ट्रीजचे (पुणे) कार्यकारी संचालक डॉसन च्यू यांनी भूषवले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search