Next
कर्दळीवन- एक अनुभूती
BOI
Thursday, March 29 | 11:02 AM
15 0 0
Share this story

दत्त संप्रदायात महत्त्वाचे स्थान असलेल्या कर्दळीवनासंबंधी विस्तृत माहिती देणारे प्रा. क्षितीज पाटुकले यांनी या पुस्तकात दिली आहे.

कर्दळीवन हे दत्तगुरूंचे गुप्त स्थान आहे. ही परिक्रमा अत्यंत अवघड मानली जाते. दत्तगुरूंच्या मनात असेल, तर ही परिक्रमा घडते, अशी धारणा आहे. पाटुकले यांनी हा खडतर प्रवास करून त्यासंबंधीचे अनुभव या पुस्तकात मांडले आहेत. या लेखनामुळे परिक्रमा करण्याची इच्छा असणाऱ्यांना मार्गदर्शन मिळू शकते. पाटुकले यांनी परिक्रमेचा इतिहासही सांगितला आहे.

पंच परिक्रमा कशी करावी, याची माहिती देताना परीक्रमेचे नियम आणि सूचनाही केल्या आहेत. कर्दळीवनाचे महात्म्य सांगून कर्दळीवनांसंबंधी समाज, अपसमज आणि श्रद्धेवर भाष्य केले आहे. परिशिष्टामध्ये दत्तप्रभूंचा दिनक्रम, सोळा अवतार, कर्दळीवन सेवा संघ आदींविषयी माहिती मिळते.

प्रकाशक : कर्दळीवन सेवा संघ
पाने : १७६
किंमत : ३०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link