Next
ऑटिस्टिक मुलांसाठी विमाकवच
प्रेस रिलीज
Thursday, February 01 | 12:09 PM
15 0 0
Share this story

चेन्नई : ‘स्टार हेल्थ इन्शुरन्स’ या आरोग्य विमा क्षेत्रातील प्रवर्तक कंपनीने ऑटिस्टिक मुलांच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने देशातील पहिली विमा योजना दाखल केली आहे. ही विमा कंपनी ऑटिझमचे निदान झालेल्या तीन ते २५ वर्षे वयोगटातील मुलांना तीन लाख रुपयांची विमा योजना देते. २०११मधील जनगणनेनुसार, भारतातील दोन ते नऊ वर्षे वयोगटातील अंदाजे २.२ दशलक्ष बालकांमध्ये ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर आहे.

या योजनेमध्ये सर्व इन-पेशंट व आउट-पेशंट उपचारांचा समावेश आहे; जसे बिहेविअरल थेरपी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी व स्पीच थेरपी अशा विविध थेरपी. ऑटिझमशी संबंधित मेडिकल व सर्जिकल गुंतागुंतीच्या इन-पेशंट व्यवस्थापनामध्ये सिझर्स, सॉफ्ट टिश्यू व बोनी इंज्युरीसाठी उपचार, स्नायूंच्या अचानक आकुंचनावर वैद्यकिय व सर्जिकल प्रक्रिया व संसर्गजन्य रोग यांचा समावेश होतो.

‘स्टार स्पेशल केअर’साठी कोणत्याही प्री-मेडिकल चेक-अपची गरज नाही. निदान व उपचार यांच्या आधारे आपल्या बालकांसाठी ही योजना खरेदी करता येते. कंपनीने ऑटिस्टिक मुलांसाठी चेन्नईतील एका स्थानिक एनजीओच्या मदतीने एक वर्ष कालावधी असलेली सामुहिक योजना २०१६मध्ये दाखल केली होती.

‘वैद्यकीय आणीबाणी किंवा गरजांच्या वेळी आवश्यक असलेले आर्थिक साह्य देण्यासाठी आम्ही दशकभरापूर्वी या कंपनीची सुरुवात केली. त्यानुसार, आम्ही साधारणतः आरोग्य विमा क्षेत्राकडून दुर्लक्षित असलेल्या व्यक्तींच्या विशेष गरजा पूर्ण करण्यासाठी साजेशी उत्पादने सादर करण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे,’ असे ‘स्टार हेल्थ अँड अॅलिड इन्शुरन्स’चे सीएमडी व्ही. जगन्नाथन् यांनी नमूद केले.

 ‘गरजेनुसार विमा देणे हे आमचे ब्रीद आहे. आरोग्य विमा ही चैनीची नाही, तर मूलभूत गरज आहे. हे विचारात घेता, योजना खरेदी करण्यासाठी किंवा दावा करण्यासाठी लोकांना घ्यावे लागणारे त्रास कमी करण्याच्या व त्यातून जास्तीत जास्त लाभ देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रत्येक उत्पादनाची रचना करतो,’ असे स्टार हेल्थ अँड अॅलिड इन्शुरन्सचे सीओओ डॉ. एस. प्रकाश यांनी सांगितले.

‘ऑटिझमचे निदान झालेल्या प्रत्येक बालकाला विशिष्ट प्रकारचे वैयक्तिक उपचार व लक्ष देणे गरजेचे असते, हे आम्हाला सामुहिक योजनेमुळे लक्षात आले व या माहितीच्या आधारे आम्ही स्टार स्पेशल केअर हे नवे उत्पादन तयार केले असून, त्यामुळे पालकांना त्यांच्या मुलांना सुरक्षित करता येईल व रुग्णालयात दाखल करावे लागल्यास आर्थिक आधार मिळेल,’ असे स्टार हेल्थ अँड अॅलिड इन्शुरन्सचे कार्यकारी संचालक व सीएमओ आनंद रॉय म्हणाले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link