Next
पौगंडावस्थेतील मुलामुलींसाठी आरोग्य तपासणी योजना
प्रेस रिलीज
Friday, March 16, 2018 | 01:34 PM
15 0 0
Share this story

पुणे : प्रतिबंधात्मक आरोग्यचिकित्सा व्यवसायातल्या अग्रणी अशा ‘इंडस हेल्थ प्लस’ यांनी एक नवीन आरोग्य तपासणी योजना जाहीर केली आहे. ‘इंडस अडोलसंट’ नाव असलेल्या या योजनेत १३ ते १८ या वयोगटातल्या मुलांसाठी तपासणी चाचण्यांचे पर्याय उपलब्ध आहेत. या सेवेचे शुल्क तीन हजार ९९९ रुपये आहे. यात डॉक्टरांचा सल्ला आणि महत्त्वाच्या रक्तचाचण्या उदा. सिरम कॅल्शियम, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, लिपीड प्रोफाइल, हेमोग्राम, सिरम बिलीरुबिन इत्यादींचा समावेश आहे.

अगदी सुरुवातीपासूनच इंडस हेल्थ प्लस प्रौढांच्या आरोग्यविषयक समस्यांसाठी तपासणी योजना घेऊन येत आले आहेत. पण मागील काही वर्षात, या जीवनशैलीविषयक आजारांचे प्रमाण पौगंडावस्थेतील मुलामुलींमध्येही वाढत असल्याचे कंपनीच्या लक्षात आले. फक्त प्रौढ आणि वृद्धच नव्हेत, तर तरुण मुलेही त्यांच्या जीवनशैलीमुळे आणि बदलत्या हवामानामुळे या आजारांना बळी पडत आहेत. डायबिटीस, हृदयरोग, पचनसंस्थेतले बिघाड, व्हिटामिन कमतरता, संसर्ग इत्यादी गोष्टी जागरूकतेअभावी लपून राहू शकतात आणि नंतर गंभीर रूप धारण करतात. वेळीच या समस्यांचा शोध लावून त्यांच्यावर उपचार झाले, तरच पुढची पिढी निरोगी राहील आणि समाजाचे एक सुदृढ अंग बनू शकेल. 

इंडस हेल्थ प्लसचे व्यवस्थापकीय सहसंचालक अमोल नायकवडी म्हणाले, ‘इंडस अडोलसंट ही योजना खास तरुण पिढीसाठी, त्यांनी संभाव्य आजार टाळून एक निरोगी आणि स्वस्थ जीवन जगावे, यासाठी आणली आहे. अरबटचरबट आहार, प्रदूषण आणि व्यायामाचा अभाव यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे त्यांचे बालपण आणि तारुण्य तर त्रासाचे होतेच, पण प्रौढावस्थेतही त्यांना जास्त त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच पालकांशी आणि डॉक्टरांशी सविस्तर विचारविनिमय केल्यानंतर, आम्ही ही खास योजना आखली आहे.’

इंडस अडोलसंट योजना सध्या मुंबई, पुणे, इंदूर आणि नागपूर येथे उपलब्ध आहे. इतर शहरांमध्येही ही योजना २०१८च्या मध्यापर्यंत कार्यरत होतील, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, २०१५मध्ये सुमारे १२ लाख मुलांचे पौगंडावस्थेत मृत्यू झाले. (म्हणजे एका दिवसाला तीन हजारपेक्षा जास्त). हे आजार टाळता, किंवा उपचार करता येण्यासारखे होते. ही योजना म्हणजे, अशा घटना टाळण्याकडे उचललेले पहिले पाऊल आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link