Next
‘बीकेटी टायर्स’चा ‘तमिळनाडू प्रीमियर लीग’बरोबर करार
प्रेस रिलीज
Friday, July 19, 2019 | 04:48 PM
15 0 0
Share this article:

चेन्नई : ऑफ-हायवे टायर्सची भारतातील आघाडीची उत्पादक असलेल्या बालकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेडने (बीकेटी) संकर सिमेंट्स तामिळ नाडू प्रीमियर लीगबरोबर (टीएनपीएल) सहकारी प्रायोजकत्वाचा करार केला आहे. दिंडीगुल येथे ‘टीएनपीएल’ची चौथी आवृत्ती सुरू झाल्यानंचर चेपॉक सुपर गिल्लीज गेल्या वर्षाचे अंतिम फेरीतले स्पर्धक दिंडीगुल ड्रॅगन्सचा सामना करतील.

या स्पर्धेत ३२ सामने होणार असून, ते १९ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान घेतले जातील. दिंडीगुल आणि तिरुनेलवेलीमध्ये प्रत्येकी १५ सामने होणार असून, चेन्नईमध्ये अंतिम सामन्यासह उर्वरित दोन सामने होतील. या स्पर्धेमध्ये सात डबल-हेडर्स पाहायला मिळणार आहेत. पहिला व दुसरा सामना अनुक्रमे दुपारी ३.१५ आणि संध्याकाळी ७.१५ वाजता सुरू होईल.

या अभियानाअंतर्गत ‘बीकेटी’ स्पर्धेच्या ठिकाणी ब्रँडिंगचे काम हाती घेणार असून, त्यात पिच मॅट्स, एलईडी बोर्ड आणि पत्रकार परिषदा तसेच मुलाखतींतून केल्या जाणाऱ्या ब्रँडिंगचा समावेश असेल. ‘टीएनपीएल’च्या जाहिरातींमध्ये ‘बीकेटी’ लोगो दिसून येईल. त्यात तमिळनाडूमध्ये सर्वत्र लावलेल्या होर्डिंग्जचा समावेश असेल. ‘बीकेटी’ स्थानिक उपक्रमांद्वारे तमिळनाडूमधील नागरिकांनाही स्पर्धेच्या सर्व ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे. 

या विषयी बोलताना ‘बीकेटी’चे सह-व्यवस्थापकीय संचालक राजीव पोतदार म्हणाले, ‘देशातील सर्वांत लोकप्रिय आणि प्रसिद्ध क्रिकेट लीगशी ‘बीकेटी’ ब्रँड जोडल्याचे पाहाणे आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. या देशात बरेच धर्म आहेत; पण क्रिकेटइतका दुसरा कोणताच धर्म भारतीयांना एकत्र आणू शकत नाही असे म्हटले जाते. ‘टीएनपीएल’ पहिल्या वर्षापासूनच यशस्वी झाले आहे आणि त्यादरम्यान तरुण गुणवत्तेचा विकास करून त्यांना देशाचे उद्याचे सुपरस्टार बनवण्याचे आश्वासन पाळले जाते. भविष्यातील विजेते घडवण्याच्या त्यांच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’

‘ही भागीदारी आमच्या अंतिम ग्राहकाच्या जवळ राहाण्याच्या आणि भारतातील ब्रँड जागरूकता वाढवण्याच्या आमच्या धोरणाचाच एक भाग आहे. ‘बीकेटी’ आमचे सहकारी प्रायोजक असल्यामुळे प्रेक्षकांना ऑफ-हायवे टायर्स, तसेच ट्रॅक्टर टायर्ससह विविध प्रकारची वाहनसंबंधी उत्पागदने सहज उपलब्ध होतील,’ असे पोतदार यांनी सांगितले.

‘टीएनसीए’चे सह-सचिव आर. आय. पालानी म्हणाले, ‘‘टीएनपीएल’च्या चौथ्या आवृत्तीसाठी ‘बीकेटी’बरोबर सहकारी प्रायोजकत्वाचा करार करून आमची लीग आणखी एक स्तर पुढे नेताना आनंद होत आहे. ऑफ-हायवे टायर क्षेत्रात ट्रेंडसेटर असलेली ही कंपनी भारतातील आघाडीचा ब्रँड असून, त्यांच्या मदतीने आमच्या निष्ठावान आणि उत्साही चाहत्यांना अविस्मरणीय आठवणी देण्याचा आमचा हेतू आहे. मला खात्री आहे, की ‘बीकेटी’मुळे ‘टीएनपीएल’चे मूल्य आणखी उंचावेल. यापुढील सहकार्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search