Next
यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांचे भवितव्य ठरविणार महिला
प्रेस रिलीज
Friday, March 15, 2019 | 05:42 PM
15 0 0
Share this article:मुंबई : महाराष्ट्रात चार टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्त्वाचा वाटा असेल. २००४, २००९ आणि २०१४च्या तुलनेमध्ये यंदाच्या निवडणुकीत महिला मतदारांचा टक्का वाढला आहे.

२००४मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यावर्षी एकूण तीन कोटी ४२ लाख ६३ हजार ३१७ मतदारांची नोंदणी झाली. २००९ आणि २०१४या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा कमी होती; मात्र २०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. २०११च्या जनगणनेनुसार एक हजार पुरुषांमागे ९२५ महिला असे प्रमाण होते. २०१४मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण एक हजार पुरुषांमागे ८८९ महिला इतके होते आता मात्र २०१९मध्ये या प्रमाणात एक हजार पुरुषांमागे ९११ महिला अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.

महिला मतदार जागृतीसाठी भारत निवडणूक आयोग, ‘स्‍वीप’ (SVEEP - Systematic Voters Education and Elector Participation) कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित आहे. महिला मतदारांची संख्या वाढविणे हा या अभियानाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, परिचारिका, महिला बचत गट, अशासकीय संस्‍था आदींचे सहकार्य महिला मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी घेण्यात येत आहे. शिवाय उद्योग, शिक्षण, सामाजिक, साहित्य, कला-संस्कृती यांसह विविध क्षेत्रांतील अग्रणी महिलांच्‍या माध्‍यमातून महिलांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्‍साहित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात २००४च्या लोकसभा निवडणुकीसाठी तीन कोटी ४२ लाख ६३ हजार ३१७ एकूण मतदार होते. २००९ लोकसभा निवडणुकीत एकूण सात कोटी २९ लाख ५४ हजार ५८ मतदार होते. यामध्ये तीन कोटी ८१ लाख ६० हजार १६२ पुरुष मतदार आणि तीन कोटी ४७ लाख ९३ हजार ८९६ महिला मतदारांचा समावेश होता. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत दोन कोटी चार लाख ७८ हजार ९३२ पुरुष मतदारांनी, तर एक कोटी ६४ लाख ८७ हजार १९० महिला मतदारांनी नाव नोंदवले.

२०१४मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी एकूण आठ कोटी सात लाख ९८ हजार ८२३ मतदारांनी नोंदणी केली. यामध्ये दोन कोटी ६६ लाख २२ हजार १८० पुरुष मतदार होते, तर दोन कोटी २० लाख ४६ हजार ७२० महिला मतदार होते. आता २०१९मध्ये आठ कोटी ७३ लाख ३० हजार ४८४ एकूण मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये चार कोटी ५७ लाख दोन हजार ५७९ पुरुष मतदार, तर चार कोटी १६ लाख २५ हजार ८१९ महिला मतदार आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search