Next
‘यू-ट्यूब म्युझिक’ची सेवा भारतात दाखल
ऐकता येणार विना जाहिरात संगीत
BOI
Wednesday, March 13, 2019 | 05:28 PM
15 0 0
Share this article:


नवी दिल्ली : ‘यू-ट्यूबने’ आपली एक मोठी सेवा ‘यू-ट्यूब म्युझिक’ आता भारतात सुरू केली आहे. ‘संगीत ट्रिमिंग सेवा’ (Music streaming service) हे याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. यापूर्वी ही सेवा केवळ अमेरिकेत होती. आता भारतातही त्याची सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी ‘स्पॉटीफाय’ (Spotify) हे संगीत अॅप नुकतेच भारतात लॉन्च करण्यात आले आहे. सध्या हे अॅप अमेरिकेत प्रचंड लोकप्रिय आहे.

या ‘यू-ट्यूब म्युझिक’ सुविधेबरोबरच ‘यू-ट्यूब प्रिमिअम’ हीदेखील सुविधा कंपनीतर्फे देण्यात आली आहे. यावर विना जाहिरात गाणी ऐकता येणार आहेत. ‘यू-ट्यूब संगीत’वर तुमच्या प्ले लिस्टमधील गाणी, लाइव्ह गाणी याशिवाय रेडिओची गाणीही ऐकता येतील. ही सेवा मोफत असली, तरी ‘यू-ट्यूब प्रिमिअम’साठी मात्र महिन्याला ९९ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. फॅमिली प्लॅनच्या धर्तीवर १४९ रुपये महिना भरून सहा जण ही प्रिमिअमची सुविधा वापरू शकतील. यासाठी कंपनीने दिलेल्या सवलतीनुसार सुरुवातीचे तीन महिने ही सुविधा ग्राहकांना मोफत मिळणार आहे.

आपले काम करत बॅग्राउंडमध्ये गाणी सुरू ठेवणे, संगीत स्ट्रिमिंग सुविधा, रेडिओची गाणी ऐकणे अशा कितीतरी गोष्टी करणाऱ्या इतर कंपन्यांच्या अॅप्सना आता ‘यू-ट्यूब म्युझिक’च्या स्पर्धेत उतरावे लागणार आहे. ‘यू-ट्यूब म्युझिक’ची ही सेवा सगळ्यांना टक्कर देणारी ठरेल. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search