Next
ठिपक्यांच्या रांगोळीतून साकारल्या नवदुर्गा
BOI
Tuesday, October 16 | 05:40 PM
15 0 0
Share this story


पुणे : नवरात्र महोत्सवात दुर्गा देवीची नानाविध रूपातील पूजा बांधली जाते. देवीची ही रूपे मन प्रसन्न करून जातात. अशी देवीची नऊ वेगवेगळी रूपे ठिपक्यांच्या रांगोळीतून साकारली आहेत पुण्यातील कथक नृत्यांगना अबोली धायरकर यांनी. 

सिंहगड रोडवरील गणेशमळा परिसरात ‘सरितानागरी फेज वन’मधील ‘स्वामी’ या त्यांच्या बंगल्यांच्या अंगणात त्यांनी या रांगोळ्या काढल्या आहेत. ठिपक्यांच्या रांगोळीतून साकारलेली देवी दुर्गेची ही विविध रूपे नजर खिळवून ठेवतात. सिंह, वाघ, अशा वेगवेगळ्या वाहनांवर आरूढ झालेली, विविध आयुधांनी नटलेली ही शक्तीरूपा अगदी बारकाईने तिथे साकारण्यात आली आहे. 

ठिपक्यांच्या साहाय्याने रांगोळी काढणे ही आपली महाराष्ट्रीय पद्धत आहे. ती टिकवून ठेवावी, या उद्देशाने अबोली धायरकर यांनी यंदा हा उपक्रम राबवला आहे. 

देवीची नऊ रूपे असतात हे अनेकांना माहीत असले, तरी ती नेमकी कोणती, त्यामागची कथा काय, याची माहिती नसते. ही सर्व माहिती लोकांना व्हावी, यासाठी ही माहितीदेखील त्यांनी रांगोळीसमवेत दिली आहे. 

नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी रांगोळी काढण्यास सुरुवात केली. दररोज एक देवीचे रूप साकारायचे असा त्यांचा विचार होता; पण लोकांना सर्व रूपे नवरात्र पूर्ण होण्याआधी पाहायला मिळणे शक्य व्हावे, यासाठी त्यांनी पाच दिवसांत सर्व रूपे पूर्ण करण्याचे ठरवले. या कामात त्यांच्या काकू गीता धायरकर आणि सूची मणेरकर यांनी साह्य केले. प्रत्येक रांगोळी पूर्ण करण्यासाठी त्यांना किमान अडीच ते चार तास लागले. 

१६ ऑक्टोबर २०१८पासून या रांगोळ्या सर्वांना बघण्यासाठी खुल्या असून, त्या दसरा किंवा सप्ताहाखेरपर्यंत ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. वारा, धूळ, कचरा यामुळे रांगोळ्या खराब होऊ नयेत याची काळजी घेणे खूप कठीण आहे. दररोज या रांगोळ्यांमध्ये काही खराब झाले असेल, तर त्याची दुरुस्ती करावी लागते, असे त्यांनी सांगितले.  

‘या रांगोळ्या बघून आजूबाजूच्या परिसरातील लोक आवर्जून येऊन भेट देत आहेत. परदेशी मुलींनादेखील या रांगोळ्यांनी भुरळ घातली.  लोक कौतुक करत आहेत, लोकांचा हा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे,’ अशी भावना अबोली दातार यांनी व्यक्त केली. 


प्रदर्शन : ठिपक्यांच्या रांगोळीतील नवदुर्गा 
स्थळ : स्वामी बंगला, गणेशमळा, सरितानगरी फेज १, दत्तवाडी, पुणे
दिवस - वेळ : १६ ते १८ ऑक्टोबर २०१८; सायंकाळी पाच ते नऊ.

(झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Vaidehi Nighojkar1 About 95 Days ago
Rangoli hi kala bhartiya sanskirti japane ahe Ti jar jopali tar sanskrutichi phar moithi suruwat hoil ase mala watate
0
0
प्रिया About 95 Days ago
अप्रतिम काम .खुप एकाग्रतेने करण्याची कला आहे हि .अभिनंदन.ठीपके रांगोळी हि खुप जुनी कला आहे तिला जतन करताय तुम्हि
0
0

Select Language
Share Link