Next
राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत स्नेहलचे यश
BOI
Thursday, February 15 | 04:37 PM
15 0 0
Share this story

आई शीतल आणि वडील नानासाहेब शिंदे यांच्यासह स्नेहल शिंदे.सोलापूर : पंढरपूर येथील स्नेहल नानासाहेब शिंदे या शाळकरी मुलीने राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात भारतात प्रथम क्रमांक मिळवत, सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. ती आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करत आहे.

स्नेहल शेतकरी कुटुंबातील असून, पंढरपूर तालुक्यातील अनवली हे तिचे मूळ गाव आहे; मात्र व्यवसायाच्या निमित्ताने शिंदे कुटुंबीय आता पंढरपुरात स्थायिक झाले आहे. पंढरपुरातील द. ह. कवठेकर प्रशालेत नववीच्या वर्गात स्नेहल शिक्षण घेत आहे.

अभ्यासात हुशार असलेल्या स्नेहलला खेळाची आणि विशेषतः रायफल शूटिंगची आवड आहे. या स्पर्धेवर शहरी मुलांचा वरचष्मा असला, तरी स्नेहलने राष्ट्रीय पातळीवरील यश मिळवून ग्रामीण भागातील विद्यार्थीही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. मोठा भाऊ निखिल रायफल शूटिंग स्पर्धेत असल्यामुळे स्नेहललाही या खेळाची आवड निर्माण झाली. या खेळाची सुरुवात तिने वयाच्या दहाव्या वर्षापासून म्हणजे पाचवीत असतानाच केली. २०१३-१४पासून ती सलग चार वर्षे सोलापूर जिल्ह्यात प्रथम, द्वितीय क्रमांक पटकावत होती. तिच्या या कामगिरीमुळे तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.

स्नेहल शिंदेगेल्या वर्षी अकलूज येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर अहमदनगर (नेवासा) येथे झालेल्या पुणे विभागीय स्पर्धेतही प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक मिळवले. पुणे येथील बालेवाडीत झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून रौप्यपदक मिळवले. त्यामुळे तिची महाराष्ट्राच्या संघाकडून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. डिसेंबर २०१७मध्ये झालेल्या ६३व्या राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये १४ वर्षे वयोगटात भारतात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेत तिने ४००पैकी ३४० गुण करून राष्ट्रीय विक्रम केला. याच वेळी सांघिक प्रकारातही १२००पैकी ९९५ गुण मिळवून या संघालाही गोल्ड मेडल मिळवून देऊन, मुलींच्या महाराष्ट्रातील संघाला भारतात प्रथम क्रमांक मिळवून दिला. चालू वर्षी तिने चार सुवर्ण, तर एक रौप्यपदक मिळवले आहे.

या खेळासाठी तिला तिचे आई-वडील आणि भावाचे प्रोत्साहन मिळते. स्नेहलची आई शीतल तिच्या दररोजच्या संतुलित आहाराची काळजी घेते, तर वडील नानासाहेब स्नेहलकडून नित्याने व्यायाम करून घेतात. स्नेहल सध्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची जोरदार तयारी करत आहे. भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवरील पदक मिळवून देण्यासाठी कसून प्रयत्न करणार असल्याची इच्छा तिने व्यक्त केली.

स्नेहलने रायफल शूटिंग स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याचा आनंद व्यक्त करून, तिचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे तिच्या आई-वडिलांनी सांगितले. स्नेहलला पंढरपूर येथील चॅम्पियन्स शूटिंग अॅकॅडमीचे प्रशांत मोरे आणि अविनाश गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले.

(स्नेहल आणि तिच्या आई-वडिलांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Shinde Mayuri About 332 Days ago
Congratulations dear 🎉💐💐💐
1
0
Rajan Patole About 333 Days ago
Congratulations!!!
1
0

Select Language
Share Link