Next
‘आदित्य’चा कलाभूषण पुरस्कार पं. बिरजू महाराज यांना जाहीर
प्रेस रिलीज
Saturday, May 11, 2019 | 01:43 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘पुण्यातील आदित्य प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा लक्ष्मी-वासुदेव कलाभूषण पुरस्कार कथ्थकसम्राट पं. बिरजू महाराज यांना जाहीर झाला आहे. १८ मे २०१९ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सायंकाळी पाच वाजता पुरस्कार वितरण सोहळा होईल. प्रतिष्ठानच्या वतीने गुरुदेव शंकर अभ्यंकर हे पं. बिरजू महाराज यांना पुरस्कार प्रदान करतील,’ अशी माहिती प्रतिष्ठानचे आदित्यव्रती श्रीकांत आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

या वेळी आदित्यव्रती अमित तुळजापूरकर उपस्थित होते. सन्मानपत्र, सरस्वती चिन्ह, एक लाख रुपये रोख रक्कम, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्या व्यक्ती आपल्या कार्याने धर्मकारण, राष्ट्रकारण, अर्थकारण, समाजकारण, शिक्षण, कला, विज्ञान आणि वाङ्मय ही संस्कृतीची अष्टांगे समृद्ध करतात, त्यांना प्रतिष्ठानतर्फे लक्ष्मी-वासुदेव पुरस्कार देउन सन्मानित केले जाते.

या सोहळ्यादरम्यान, कथ्थकसम्राट पं. बिरजू महाराज हे भावमुद्रा प्रकट करणार असून, पुरस्कार वितरणानंतर कार्यक्रम पं. मनीषा साठे व त्यांच्या शिष्या, तसेच शांभवीज् इंटरनॅशनल स्कूल ऑफ कथ्थकच्या विद्यार्थिनी ‘कथ्थक नृत्यसंध्या’ हा विशेष सादर करणार आहेत.

भारतीय संतांचे विचार आणि अध्यात्म समाजापर्यंत योग्य स्वरूपात पोहोचवण्याचे कार्य आदित्य प्रतिष्ठानमार्फत गेली ३५ वर्षे केले जात आहे. प्रतिष्ठानतर्फे लोणावळ्याजवळ ३३ एकर जागेत जगातील पहिले संत विद्यापीठ साकारले जात असून, देशातील प्रत्येक प्रांतातील संतवाङ्मयाचे येथे जतन केले जाणार आहे. प्रतिष्ठानचा यंदा ३६वा वर्धापनदिन आहे.

पुरस्काराविषयी :
दिवस : शुक्रवार, १८ मे २०१९ रोजी 
वेळ : सायंकाळी पाच वाजता 
स्थळ : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search