Next
बजाज अलियांझ हाफ मॅरेथॉनसाठी पुणे सज्ज
‘वेलनेस’ संकल्पनेवरील देशातील पहिली मॅरेथॉन
BOI
Wednesday, December 05, 2018 | 04:23 PM
15 0 0
Share this article:


पुणे : येत्या रविवारी,९ डिसेंबर २०१८ रोजी होणाऱ्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनसाठी (पीएचएम) पुणे शहर सज्ज झाले आहे. ‘वेलनेस’ अर्थात उत्तम आरोग्य या संकल्पनेला उत्तेजन देण्यासाठी ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली असून, त्यात मान्यवर कलाकारांसह, देशभरातील स्पर्धक सहभागी होणार आहेत. ग्रामीण भागातूनही या मॅरेथॉनला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. यातील विजेत्यांना २१ लाख ५० हजार रुपयांची रोख बक्षीसे दिली जाणार आहेत. 

रायन हॉल
अमेरिकेतील धावपटू रायन हॉल हे या कार्यक्रमाचे ब्रँड अॅम्बेसेडर असून, ते त्यांची पत्नी, चॅम्पियन रनर सारा यांच्यासह कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मंदिरा बेदी मॅरेथॉनचे सूत्रसंचालन करणार आहेत.

संपूर्ण कुटूंबाने एकत्र धावावे या उद्देशाने आखण्यात आलेली सहा किलोमीटरची ‘फॅमिली रन’ हे या मॅरेथॉन स्पर्धेचे खास वैशिष्ट्य आहे. कुटुंबे व बालकांमध्ये वेलनेसची सवय रुजवणे, हा त्यामागील हेतू आहे. यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना त्यांच्या आवडीचा पोशाख करणे, प्रॉप्स वापरणे, मुख्य संकल्पनेशी संबंधित कपडे घालणे शक्य होणार असल्याने फॅमिली रन अधिक धमाल ठरणार आहे. त्यामुळे ही खऱ्या अर्थाने कार्निव्हल-थीम्ड रन ठरणार आहे. 

मंदिरा बेदी
या मॅरेथॉनसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण सत्राला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, पुणे शहर हे भारतातील सर्वात फिट शहर असल्याचे अधोरेखित केले आहे. हा उपक्रम म्हणजे वैयक्तिक प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव लांब पल्ल्याची रेस ठरावी, या हेतूने ‘रन स्मार्ट’ (S.M.A.R.T.) प्रकल्पाबरोबर पुणेकर व देशभरातील अन्य व्यक्ती खडतर परिश्रम घेत आहेत. हा कार्यक्रम, रन स्मार्ट प्रकल्पातील, जगातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून लोकप्रिय असलेले डॉ. जॅक डॅनिअल्स यांनी आखला आहे. डॉ. डॅनिअल्स यांनी ऑक्टोबर महिन्यात या कार्यक्रमाचे उद्घाटन केले होते.

डॉ. जॅक डॅनिअल्स
बजाज अलियांझ पीएचएम ही अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाची (एएफआय) मान्यताप्राप्त स्पर्धा असून, रेसकोर्स एम्सकडूनही प्रमाणित आहे. यामध्ये नियमितपणे धावणाऱ्यांसाठी २१.१ किलोमीटरची हाफ मॅरेथॉन आणि दहा किलोमीटर रन होणार आहेत. पोलीस आणि पालिका विभागातील कर्मचाऱ्यांना सहभागी होण्यासाठी कमिशनर्स कप व मेयर्स कप अशा दोन विशेष श्रेणी उपलब्ध आहेत. 

‘पोलीस व महापालिकेचे विभाग यांमध्ये वेलनेस ही संकल्पना प्रसृत करणे, हा यामागचा उद्देश आहे. समाज सुरळीतपणे चालण्यासाठी ते देत असलेल्या प्रचंड योगदानाची दखल घेणे व गौरव करणे, हाही हेतू आहे’, असे कार्यक्रमाचे आयोजक एपीजी रनिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास सिंग यांनी नमूद केले.

बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनच्या यशाविषयी बोलताना, बजाज अलियांझचे चीफ मार्केटिंग ऑफिसर चंद्रमोहन मेहरा म्हणाले, ‘या स्पर्धेला भरभरून मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. सर्वसमावेशक फिटनेस चळवळीला चालना देणे, या आमच्या उद्देशाला त्यामुळे आणखी पाठबळ मिळाले आहे. सहभागींना धावण्याचा अविस्मरणीय अनुभव मिळावा आणि या कार्यक्रमानंतरही फिटनेसमध्ये सातत्य राहावे, यासाठी आनंदी सुरुवात व्हावी, अशी आमची इच्छा आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये धावण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकानेक खेळाडू देशाचा अभिमान वाढवत आहेतच, शिवाय शहरस्तरावरील लांब पल्ल्याच्या मॅरेथॉन रन्समध्ये भाग घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. देशात धावण्याला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने बजाज अलियांझ पीएचएमच्या निमित्ताने योगदान मिळाले आहे.’ 
 
ही मॅरेथॉन व्यवस्थित पार पडावी, सर्वांना सुरळीतपणे यात धावता यावे, यासाठी पोलीस विभाग व महापालिकेने चोख नियोजन केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search