Next
संसदीय अंदाज समितीच्या अध्यक्षपदी गिरीश बापट
BOI
Friday, July 26, 2019 | 05:02 PM
15 0 0
Share this article:

गिरीश बापटपुणे : संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी खासदार गिरीश बापट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेचे सभापती ओमप्रकाश बिर्ला यांनी त्यांची नियुक्ती केली. या समितीमध्ये लोकसभेमधील ३० सदस्य आहेत.

अर्थमंत्री अंदाजपत्रक मांडत असतात, या अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट केलेल्या अंदाजाची चिकित्सा करणे, शासनाच्या खर्चात काटकसर सुचवून शासकीय धोरणात आणि प्रशासकीय व्यवस्थेत कार्यक्षमता कशी वाढेल या दृष्टीने मार्गदर्शनपर सूचना करणे या सारखी कामे या समितीला करावी लागतात. ही समिती शासकीय धोरणानुसार व योजनांनुसार व अंदाजपत्रकात नमूद केल्याप्रमाणे निधीवाटप केला आहे की नाही, याबाबत पडताळणी करते. या समितीने केलेल्या शिफारशी स्वीकारण्याचे लोकसभेला बंधनकारक नसल्या, तरी समितीच्या सूचना व शिफारशी मार्गदर्शनपर असतात. समितीच्या स्थापनेपासून अनेकदा  या समितीने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.  

या समितीच्या सदस्यांमध्ये धर्मेंद्रकुमार कश्यप, मोहनभाई कुंडारिया, दयानिधि मारण, के. मुरलीधरन, एस. एस.पलानीमणीक्कम, कमलेश पासवान, के. सी. पटेल, राजवर्धन सिंग राठोड, विनायक राऊत, अशोककुमार रावत, मागुंटा श्रीनिवासुलू रेड्डी, राजीव प्रताप रुडी आदींचा समावेश आहे.   
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search