Next
मुंबईकर रमले कॉमिकच्या दुनियेत
प्रेस रिलीज
Thursday, December 27, 2018 | 02:29 PM
15 0 0
Share this story

मुंबई : कॉमिक जगतातील सर्जनशील कलाकारांना भेटण्याची संधी मुंबईकरांना ‘मुंबई कॉमिक कॉन-२०१८’च्या निमित्ताने मिळाली. मुंबईत गोरेगाव येथील मुंबई एक्झिबिशन सेंटर येथे २२ व २३ डिसेंबरला कॉमिक कॉनचे आयोजन करण्यात आले होते. या कॉमिकच्या आगळ्यावेगळ्या दुनियेत मुंबईकर चांगलेच रमले.

दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनात पहिल्या दिवशी ‘दी एक्सट्रीमली बोल्ड सेशन बाय डोरिटोज’ आणि ‘मॅजिक इन मसुरी’, ‘ऱ्हिमी फायटर्स’ आदी व्यंगचित्र मालिकांचे प्रकाशन करण्यात आले; तसेच कलाकार अभिजित किणी, विल कॉनरॉड, साहिल शाह, जसमित सिंग भाटिया यांचे सादरीकरण, अभिनेते दारा सिंह यांच्या जीवनावर आधारित कॉमिक बुकचे प्रकाशन, ‘दी टाइमलायनर्स’ या युट्युबर चमूच्या सादरीकरणाचा आनंद उपस्थितांनी घेतला.

दुसऱ्या दिवशी ‘गेम्स दी शॉप’, ‘रिव्हर कॉमिक्स’, ‘सेशन विथ दी अगली स्वीटर टीम’, कलावंत मार्क किस्टलर याच्यासोबत लाइव्ह आर्ट सेशन, लेखक शमिक दासगुप्ता, विवेक गोयल यांच्या कॉमिक्समधील पात्रांना भेटण्याची संधी, लाइव्ह आरईडी स्पेशल सेशन, अमेरीकन कॉमिक बुक लेखक प्रकाशक आणि मार्व्हल कॉमिक्सचे स्टॅन ली यांच्या आठवणी, कॉमिक्स, चित्रपट, दूरचित्रवाणी, गेमिंग, कॉस्प्ले असे विविध कार्यक्रम झाले.

कॉमिक कॉनच्या चाहत्यांनी कॉमिक बुक्स, चित्रपट, टीव्ही शो आणि गेम्समधल्या आपल्या आवडत्या कॅरेक्टरसारखी वेशभूषा साकारली होती. सर्वात छान आणि व्यवस्थित डिझाइन केलेली वेशभूषा परिधान करणाऱ्या कॉस्प्लेयर्सना रोख बक्षिसे देण्यात आली. दोन्ही दिवशी एका भाग्यशाली विजेत्याला ५० हजार रुपयांचे रोख बक्षीसदेखील देण्यात आले. हे विजेते ‘इंडियन कॉस्प्ले चॅम्पियनशिप २०१९’मध्ये दाखल झाले असून, शिकागोमधील ‘क्राउन वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ कॉस्प्ले’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link