Next
शिधापत्रिकेवरील धान्य वितरण; ई-पॉस यंत्राच्या वापराबाबत सर्वेक्षण
BOI
Monday, September 17, 2018 | 12:24 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोभिवंडी : शिधावाटपाचे काम संगणकीकृत झाले आहे; मात्र त्यानंतरही ई-पॉस यंत्राशिवाय धान्य नेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याबद्दल राज्यव्यापी सर्वेक्षण केले जाणार आहे. ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातील २० दुकानांची तपासणी १८ आणि १९ सप्टेंबर २०१८ रोजी करण्यात येणार आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी जलसिंग वळवी म्हणाले, ‘जिल्ह्यात ५९० शिधावाटप दुकानांना ई-पॉस यंत्रे देण्यात आली असून, त्या दुकानदारांना या यंत्राचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. ग्राहकदेखील या यंत्राच्याच माध्यमातून धान्याची उचल करतात; मात्र ‘ई-पॉस’चा वापर न करता २५ टक्क्यांपेक्षा जास्त धान्याची उचल झालेल्या २० दुकानांची आणि त्यातील ग्राहकांची काटेकोर तपासणी करण्यात येणार आहे. हे धान्य ‘ई-पॉस’च्या माध्यमातून का देण्यात आले नाही, याचा अहवालही तयार करण्यात येणार आहे. यामागील कारणे शोधल्यास १०० टक्के ऑनलाइन व्यवहार शक्य होतील. ही तपासणी या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या धान्याच्या विक्रीवर आधारित असेल. भिवंडी तहसीलदार, नायब तहसीलदार आणि पुरवठा निरीक्षक यांचे पथक १८ आणि १९ तारखेला दुकानांना भेटी देऊन सर्व व्यवहार तपासतील. शासनाने त्यांना विवरणपत्र दिले असून, त्यात विविध कारणेही नमूद करण्यात आली आहेत.’

निश्चित करण्यात आलेल्या दुकानांतील कमीत कमी २० ग्राहकांना बोलावून त्यांनाही याबद्दल विचारणा करण्यात येईल. तसेच ई-पॉस मशीनमध्ये नाव नसणे, दुकानांमध्ये नेटवर्क नसणे, आधार सीडिंग न होणे, सर्व्हरला माहिती उपलब्ध न होणे, संबंधित कार्यालयाकडून योग्य सहकार्य न मिळणे या कारणांचीही तपासणी करण्यात येणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search