Next
‘सामान्य जनतेला सर्वोत्तम आरोग्य सेवा उपलब्ध होतील’
पालकमंत्री विजय देशमुख यांचा विश्वास
BOI
Friday, March 08, 2019 | 01:20 PM
15 0 0
Share this storyसोलापूर : ‘सोलापूर येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या जिल्हा रुग्णालय व महिला आणि नवजात शिशु रुग्णालयामुळे गरीब, सामान्य जनतेला सर्वोत्तम आरोग्य सेवा उपलब्ध होतील,’ असा विश्वास पालकमंत्री विजय देशमुख यांनी येथे व्यक्त केला.

सोलापूर येथे आरोग्य विभागामार्फत उभारण्यात येणाऱ्या १०० खाटांचे जिल्हा रुग्णालय आणि महिला व नवजात शिशु रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महापौर शोभा बनशेट्टी, आमदार प्रशांत परिचारक, उपमहापौर शशिकला बत्तुल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार, कार्यकारी अभियंता विलास मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमेध अंदूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, ‘आरोग्य सेवेपासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी शासनामार्फत आरोग्याच्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. सोलापूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात वाढत्या रुग्ण संख्येमुळे अनेक रुग्णांना सेवा देण्यास अडचण निर्माण होत होत्या. जनतेला चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी जिल्ह्यात स्वतंत्र जिल्हा रुग्णालयाची आवश्यकता होती. नव्याने होणाऱ्या जिल्हा रुग्णालयामुळे सिव्हील हॉस्पिटलवरील ताण कमी होऊन रुग्णांना उत्तम सेवा मिळण्यास मदत होईल.’

‘प्रत्येकी २० कोटी रुपये खर्चून जिल्हा रुग्णालय आणि महिला व नवजात शिशु रुग्णालय उभारण्यात येणार आहेत. या रुग्णालयांमध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा व आधुनिक यंत्र सामुग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रुग्णालयाचे काम दर्जेदार व मुदतीत पूर्ण व्हावे,’ असे पालकमंत्र्यांनी या वेळी सांगितले.
 
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंदूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यकारी अभियंता विलास मोरे यांनी प्रास्ताविक केले. अधिक्षक अभियंता शेलार यांनी रुग्णालयाचे बांधकाम मुदतीत केले जाईल, असे आश्वासन देऊन आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link