Next
‘बँक ऑफ महाराष्ट्र’तर्फे स्वच्छता पंधरवडा
प्रेस रिलीज
Thursday, January 31, 2019 | 01:59 PM
15 0 0
Share this article:पुणे : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक ए. सी. राऊत आणि कार्यकारी संचालक हेमंतकुमार टम्टा यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन केले होते. या पंधरवडा बँकेने आपल्या देशभरातील महत्त्वाच्या शाखा आणि प्रशासकीय कार्यालयांमध्ये आयोजित केला होता.

या विषयी बोलताना बँकेचे कार्यकारी संचालक राऊत म्हणाले, ‘आम्हाला विश्वास वाटतो की, आमच्या बँकेचे राज्यामध्ये सर्वाधिक शाखांचे जाळे आहे आणि त्या माध्यमातून स्वच्छता आणि दीर्घकालीन आरोग्यदायी पर्यावरण संदर्भात जागरूकता आणणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही हाती घेतलेल्या पुढाकाराने सामान्यांवर दीर्घ आणि चिरस्थायी ठसा उमटेल.’

लोकांमध्ये स्वच्छतेसंदर्भात जागरूकता आणण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या देशभरातील शाखांद्वारे विविध उपक्रम राबवण्यात आले. स्वच्छता रॅली, कार्यालय आणि कार्यालयीन परिसराची स्वच्छता, निवासी वसाहती व सार्वजनिक जागा येथे स्वच्छता, याबरोबरच स्वच्छतागृहे, उद्याने, कचरापेटी यांच्याही स्वच्छतेचे काम देशभरातील ३० अंचल कार्यालयांतर्गत कार्यरत शाखांच्या माध्यमातून हाती घेण्यात आले. या पंधरवड्यादरम्यान स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये संवेदनशीलता आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी आणि स्वच्छता मोहिमेस अधिक व्यापकता येण्याच्या जनजागृतीच्या दृष्टीने बँकेतर्फे ही मोहीम हाती घेतली गेली होती.

बँकेचे कार्यकारी संचालक टम्टा म्हणाले, ‘केवळ शारीरिक स्वच्छता पुरेशी नसून, स्वच्छता ही मनापासून आली पाहिजे. दृश्य स्वरूपाद्वारे पोहोचवलेला संदेश लोकांवर दीर्घकालीन परिणाम करणारा असतो. दैनंदिन स्वच्छता राखण्याच्या आणि स्वच्छ राहण्याच्या सवयींमुळे व्यवसायाच्या ठिकाणी आणि जनसमूहाच्या ठिकाणी आरोग्यदायी पर्यावरण राहू शकेल. आम्ही आमच्या पूर्ण संसाधनांसहित ‘स्वच्छता पंधरवडा’ साजरा करण्याचे ठरवले आहे.’

‘स्वच्छ भारत’ अभियानंतर्गत दिनांक १६ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत केंद्र शासनाच्या वित्तीय सेवा विभागाच्या परिपत्रकाप्रमाणे स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन बँकेतर्फे करण्यात आले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search