Next
डेटा साक्षरतेमध्ये भारतीय कर्मचारी अव्वल
प्रेस रिलीज
Friday, March 23, 2018 | 05:13 PM
15 0 0
Share this story

मुंबई : डिजिटल-प्रेरित आधुनिक अर्थव्यवस्था म्हणून भारताचा विकास साधण्यात डेटा साक्षरतेची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचा निष्कर्ष डेटा विश्लेषणातील एक आघाडीची कंपनी क्लिकने नोंदवला आहे. आशिया-पॅसिफिक डेटा साक्षरता सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. व्यवसायाचे अधिक धोरणात्मक आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी संबंधित डेटाचा लाभ भारतीय व्यावसायिक कसा घेत आहेत याचे विवेचन या संशोधनात्मक सर्वेक्षणात करण्यात आले आहे.

भारतीय कर्मचाऱ्यांचा कामावर डेटाचा वापर अधिकाधिक करण्यावर भर असतो. ८५ टक्के  कर्मचाऱ्यांनी  सांगितले की, तीन वर्षांपूर्वी ते करत होते त्यापेक्षा आज ते अधिक प्रमाणात डेटाचा उपयोग करत आहेत आणि जवळजवळ चारपैकी तीन जण (७२ टक्के ) आपल्या सध्याच्या जॉब रोलमध्ये आठवड्यातून एकदा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा डेटा वापरतात. भारतातील कर्मचारी त्यांच्या नोकरीमध्ये डेटा आणि डेटा साक्षरतेचे महत्व मान्य करतात.

भारतामध्ये सर्वेक्षण केलेल्या एक हजार पूर्ण वेळ कर्मचाऱ्यांपैकी ९९ टक्के कर्मचाऱ्यांनी, डेटा त्यांना त्यांचे काम अधिक चांगल्या प्रकारे करण्यास मदत करीत असल्याचे सांगितले. उच्च डेटा साक्षरता कामाच्या ठिकाणी त्यांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी सहाय्यक ठरत असल्याचे ९६ टक्के  कर्मचाऱ्यांनी सांगितले.

 सर्वात जास्त डेटा साक्षरांसह भारत (४५ टक्के विरुद्ध क्षेत्रीय सरासरी २० टक्के ) आघाडीवर असून जपानमध्ये केवळ सहा टक्के कर्मचारी स्वतःला डेटा साक्षर म्हणवतात. (भारत ६४ टक्के  ऑस्ट्रेलिया ३९ टक्के  आणि सिंगापूर ३१ टक्के ) वय वर्षे ५५ हून अधिक असलेल्या कर्मचाऱ्यांचा विचार केल्यास या बाबतीत भारतातील ३२ टक्के  आणि ऑस्ट्रेलियातील २० टक्के  कर्मचारी या क्षेत्रातील इतर देशांपेक्षा अधिक डेटा साक्षर आहेत. भारतातील ८८ टक्के , चीनमधील ७६ टक्के  आणि सिंगापूर येथील ७५ टक्के   कर्मचाऱ्यांना  त्यांचे नियोक्ते डेटा मिळवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी साहाय्य करतात.

क्लिकचे  आशिया-पॅसिफिक विभागाचे  डेटा साक्षरता तज्ज्ञ पॉल मॅक्लेन म्हणाले, ‘वेगाने होत असलेल्या डिजिटायझेशनमुळे भारत आतापर्यंतच्या इतिहासाच्या तुलनेत कधीही नव्हता इतक्या जास्त वेगाने डेटा निर्माण करीत आहे. ही कौतुकाची गोष्ट आहे की, भारतीय कर्मचाऱ्यांनी या बदलत्या परिस्थितीशी छान जुळवून घेतले आहे. दहा पैकी नऊ डेटा साक्षर कामात चांगली कामगिरी करीत आहेत. डेटा व्यक्तीच्या कामगिरीवर तसेच व्यापक दृष्ट्या मोठ्या व्यवसाय संचालनावर परिणाम करत असतो त्यामुळे आम्ही भारतातील अधिकाधिक व्यावसायिकांनी त्यांच्यातील डेटा साक्षरता कौशल्य वाढवावे अशी अपेक्षा करतो’.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link