Next
‘वोक्हार्ट’तर्फे परिचारिकांसाठी विशेष प्रशिक्षण
प्रेस रिलीज
Wednesday, September 12 | 01:03 PM
15 0 0
Share this story



मुंबई : सुपर स्पेशालिटी रुग्णालयांची शृंखला असलेल्या वोक्हार्ट रुग्णालयातर्फे परिचारिकांमधील नेतृत्वगुण विकसित करण्याच्या दृष्टीने तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. पश्चिम भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम होता.

रुग्णालयातर्फे आयोजित केलेल्या नवव्या वार्षिक नर्सिंग नेतृत्वगुण कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याची सुरूवात ‘वोक्हार्ट’च्या मिरा रोड येथे झाली. या वेळी नागपूर, नाशिक, वाशी, राजकोट, सुरत, मध्य मुंबईसह, उत्तर मुंबईतील रुग्णालयातून या विशेष कार्यक्रमासाठी २६ नर्सेसची निवड करण्यात आली. हा पूर्ण कार्यक्रम दोन भागांत विभागलेला असून, चार महिन्यांचा थांबा घेऊन त्यांना दिलेले ट्रेनिंग या वेळेत आपल्या कार्यपद्धतीत कशापद्धतीने अवलंबतात हे पाहिले जाईल.

याबाबत बोलताना ‘वोक्हार्ट’च्या व्यवस्थापकीय संचालक जहाबिया खोराकीवाला म्हणाल्या, ‘वोक्हार्ट रुग्णालयातर्फे आयोजित केलेला नर्सिंग लिडरशिप प्रोग्राम हा अतिशय वेगळा उपक्रम असून, यामुळे नर्सेसच्या कार्यशैलीतील नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होईल. हा कार्यक्रम एका विशिष्ट पद्धतीने निर्माण केला असून, यामुळे नर्सिंग स्टाफचे मनोबल वाढण्यास मदत होईल शिवाय एक उत्तम नर्सिंग कर्मचारी बनण्यासाठी मदत होईल.

या कार्यक्रमांतर्गत अनेक विषयांवर मार्गदर्शन मिळणार असून, नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, तसेच नर्सेस या दूत म्हणून पाहिल्या जातात, वैद्यकिय गव्हर्नन्स, एचआर, वार्डची तयारी व व्यवस्थापन तसेच संस्थेला अपेक्षित असणाऱ्या, रुग्णसेवा आदी विषयांवर मार्गदर्शन केला जाणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link