Next
रत्नागिरी ग्राहक पंचायतीतर्फे विद्यार्थ्यांसाठी २५ ऑगस्टला निबंध स्पर्धा
BOI
Wednesday, August 14, 2019 | 01:00 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : ग्राहक प्रबोधनाच्या हेतूने रत्नागिरी ग्राहक पंचायतीतर्फे आठवी ते दहावी आणि अकरावी-बारावी या दोन गटांत निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. २५  ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत फाटक हायस्कूल येथे ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या ठिकाणी येऊन निबंध लिहायचा आहे. त्या वेळी विद्यार्थ्यांनी ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. माझे गाव-स्वच्छ गाव, स्वच्छता अभियानात मी.. हे विषय आठवी ते दहावीच्या गटासाठी आहेत. मोबाइल - मित्र, शत्रू की आणखी काही?, डॉक्टर-रुग्ण नाते की डॉक्टर ग्राहक? हे विषय अकरावी, बारावीच्या गटासाठी आहेत. स्पर्धेसाठी शब्दमर्यादा नाही; मात्र कालमर्यादा एक तास आहे.

प्रत्येक गटातील पहिल्या तीन क्रमांकांना ७०० रुपये, ५०० व ३०० रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. नावनोंदणीसाठी प्रतिभा प्रभुदेसाई (९५४५५ ०६२५३) आणि विनय परांजपे (९९२२२ ६०६४१) यांचयाशी संपर्क साधावा. व्हॉट्सअॅपवर नावनोंदणी करताना शाळेचे नाव, स्पर्धकाचे नाव व संपर्क क्रमांक देणे आवश्यक आहे. सर्व शाळांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना भाग घेण्यात प्रोत्साहित करावे, तसेच प्रशालेत ग्राहक प्रबोधनाचा एखादा कार्यक्रमही आयोजित करावा, असे आवाहन ग्राहक शिक्षण विभागाने केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search