Next
‘सह्याद्री हॉस्पिटल्स’तर्फे मोफत यकृत तपासणी शिबिर
जागतिक यकृत दिनानिमित्त आयोजन
प्रेस रिलीज
Tuesday, April 23, 2019 | 05:24 PM
15 0 0
Share this article:

पुणे : जागतिक यकृत दिनाचे औचित्य साधून (१९ एप्रिल) सह्याद्री हॉस्पिटल्सतर्फे मोफत यकृत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर एक मे ते ३० जुलै २०१९ दरम्यान महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घेण्यात येणार आहे. योग्य वेळी निदान व उपचार व्हावे व पुढील गुंतागुंत टाळून यकृताच्या आजारांच्या प्रतिबंधाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरादरम्यान यकृताच्या आजाराशी लढा दिलेल्या रुग्णांचा लिव्हर चॅम्पियन्स म्हणून सन्मान करण्यात येणार आहे; तसेच हे रुग्ण इतरांना प्रोत्साहित करण्यासाठी आपले अनुभव सांगणार आहेत. यामुळे यकृताच्या आजारांबद्दल जागृती वाढण्यास मदत होणार आहे.

या विषयी बोलताना सह्याद्री हॉस्पिटल्सचे यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ बिपिन विभूते म्हणाले, ‘भारतामध्ये यकृताचे आजार ही अत्यंत सर्वसाधारण बाब झाली असून, ही अतिशय गंभीर व काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. यकृताच्या आजारांचे प्रमुख कारण म्हणजे बदलती आणि व्यस्त जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि विविध प्रकारची व्यसने त्यातही अतिशय गंभीर गोष्ट म्हणजे केवळ शहरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागात राहणार्‍या नागरिकांमध्येही यकृताचे आजार वाढत आहेत. त्यामुळेच यकृताचे आजार व समस्या यांची लवकरात लवकर अचूक निदान होऊन त्यावर योग्य उपचार सुरू झाल्यास अनेक नागरिकांना जीवदान मिळेल; मात्र त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती होण्याची गरज आहे. हे सर्व लक्षात घेऊनच सह्याद्री हॉस्पिटल्सने मे, जून, जुलै २०१९या कालावधीत विविध शहरांमध्ये मोफत यकृत तपासणी शिबिरांचे आयोजन केले आहे. त्यामुळे नागरिकांनी या शिबिराला अवश्य भेट द्यावी आणि आपली तपासणी करून घेऊन आपले आरोग्य सुरक्षित राखण्याची संधी साधावी.’

मराठवाडा, पश्‍चिम व उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईसह २० यकृत तपासणी शिबिरे होणार आहेत. अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, बारामती, इंदापूर, औरंगाबाद, जालना, मुंबई, परभणी, लातूर, चिपळूण, रत्नागिरी, सोलापूर, उस्मानाबाद, नाशिक, जळगाव आणि अकलूज या शहरांमध्ये ही शिबिरे होतील. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search