Next
मनोज कोटक यांनी घेतल्या महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या भेटी
प्रेस रिलीज
Friday, April 05, 2019 | 05:25 PM
15 0 0
Share this article:



मुंबई : उत्तर-पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी चार एप्रिल २०१९ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले या महायुतील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान सर्वच नेत्यांनी कोटक यांना लोकसभा निवडणुकीतील पहिल्यावहिल्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

कोटक यांनी मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’ या त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. उत्तर-पूर्व मुंबई मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनीही कोटक यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांच्यासोबत ‘भाजप’चे नेते आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता उपस्थित होते.



त्यानंतर थेट ‘मातोश्री’ हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान गाठत त्यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी उद्धव यांनी कोटक यांच्या महापालिकेतील कार्याची प्रशंसा केली. महापालिकेतील कामाच्या बळावर तुम्ही जरूर यशस्वी व्हाल, अशा शुभेच्छाही कोटक यांना दिल्या. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री व ‘रिपाई’चे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले यांचीही कोटक यांनी त्यांच्या वांद्रे पूर्व येथील ‘संविधान’ या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. या वेळी आपले कार्यकर्ते तुमच्या प्रचारात पूर्ण ताकदीने सामिल होतील, असे आश्वासन आठवले यांनी दिले. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search