Next
‘स्विफ्ट’ व ‘स्प्लेंडर प्लस’ला ग्राहकांची पसंती
प्रेस रिलीज
Friday, February 08, 2019 | 05:55 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : भारतीय ग्राहकांमध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट आणि हिरो स्प्लेंडर प्लसला सर्वात पसंतीची वाहने म्हणून मान्यता मिळाली असल्याचे भारताची आघडीची ऑनलाइन ऑटोमोबाइल बाजारपेठ ‘ड्रूम’च्या ‘ऑटोमोबाइल प्रचलन अहवाल २०१८’मधून दिसून आले आहे.

या अहवालानुसार हारले डिव्हिडसन स्ट्रीट ७५० आणि बीएमडब्ल्यू फइव्ह सिरीज या अनुक्रमे सर्वात लोकप्रिय लक्झरी बाइक व कार असून, गेल्या वर्षी ‘ड्रूम’च्या एकूण विक्रीत मोटारींच्या विक्रीचा वाटा ४२ टक्के, स्कूटर्सचा २८ टक्के, बाइक्सचा २२ टक्के, तर लक्झरी कार्स आणि सुपरबाइक्सचा वाट सात ते आठ टक्के इतका होता.

बाइक्सची सरासरी विक्री किंमत ५४ हजार तसेच मोटारींची साडेसह लाखांपासून पुढे होती. हॅचबॅक्सने खरेदीकर्त्यांसाठी आपली पसंती अबाधित राखली, तसेच खरेदीकर्त्यांनी पाच-सहा वर्षे वापर झालेल्या गाड्या शोधल्या. दुचाकी खरेदीकर्त्यांनी उत्पादन वर्ष २०१५ ते २०१७ असलेल्या दुचाकींसाठी पसंती दिली.

या वर्षी, खरेदीकर्त्यांनी वर्षभरातील पेट्रोलसाठीच्या दर बदलांना विचारात घेऊन डिझेल इंधन कार्सना सर्वाधिक म्हणजेच ५९ टक्के इतकी पसंती दिली. ‘मेक इन इंडिया’उपक्रमाला आणखी बळकटी देत, वर्ष २०१८मध्ये ३४ टक्के ग्राहकांनी भारतीय बनावटीच्या वाहनांना, त्यामागोमाग २१ टक्के जपानी व १७ टक्के दक्षिण कोरीयन वाहन उत्पादकांना पसंती दर्शवली.

‘ड्रूम’चे संस्थापक आणि सीईओ संदीप अगरवाल म्हणाले, ‘ड्रूमसाठी २०१८ हे वर्ष यशस्वी वर्ष होते व प्रत्येक ‘ड्रूम’ कर्मचाऱ्याने घेतलेले श्रम आम्ही साध्य करू शकलेल्या जबरदस्त व्यवसाय वृद्धीमध्ये प्रतिबिंबित होते. प्रचलने ऑटॉमोबाइल मार्केटच्या एकंदर आरोग्यपूर्ण वृद्धीला दर्शवतात, ज्यात अधिक खरेदी व विक्रीकर्ते ऑनलाइन जाण्यास प्राधान्यता देतात. आम्ही निवडून व सर्व सर्व पारिस्थितीचा तंत्रासह रोचक प्रचानलनाने परिपूर्ण असा उद्योग अहवाल सादर करताना आनंदी आहोत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search