Next
‘शाळेच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न’
BOI
Wednesday, August 01, 2018 | 06:21 PM
15 0 0
Share this story

इंग्रजी माध्यम शाळेच्या वाचनालयाचे उद्घाटन करताना भक्ती पित्रे-नायर, सूरज नायर. शेजारी अॅड. बाबा परुळेकर, सुमिता भावे. (दुसऱ्या छायाचित्रात) कक्षाचे उद्घाटन करताना देणगीदार जयंत प्रभुदेसाई. शेजारी उर्मिला नामजोशी, शरयू टिकेकर

रत्नागिरी :
‘आज मी कॅलिफोर्नियात एका नामवंत कंपनीत नोकरीला आहे; मात्र त्याचे श्रेय माझ्या शाळेने केलेल्या संस्कारांमुळे झालेल्या जडणघडणीला आहे. त्यामुळेच मी आज इथे येऊन पोहोचले आहे. म्हणूनच शाळेच्या या ऋणातून उतराई होण्याकरिता छोटेसे योगदान असावे, असे मनात आले. त्यामुळेच मी शाळेला देणगी दिली. सामाजिक जाणिवेचे संस्कार माझ्या मुलांवरही व्हावेत,’ अशी भावना भक्ती पित्रे-नायर यांनी व्यक्त केली. 

रत्नागिरीचे अभ्यंकर विद्यामंदिर, फाटक हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या भक्ती पित्रे-नायर यांनी दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या वाचनालयासाठी कै. मालिनी आणि कै. गदाधर पित्रे यांच्या स्मरणार्थ पाच लाख रुपयांची देणगी दिली. तसेच, कौन्सिल सदस्य जयंत प्रभुदेसाई यांनी तीन लाख रुपयांची देणगी दिली. त्यानंतर शाळेतील कक्षाचे ‘श्रीमती मंगला ग. प्रभुदेसाई कक्ष’ असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात उपस्थितांनी मनोगते व्यक्त केली.

मनोगत व्यक्त करताना भक्ती पित्रे-नायर

संस्थेचे अध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर म्हणाले, ‘गुरुवर्य पु. वा. फाटक गुरुजींनी ज्या संस्कारातून शाळा सुरू केली, त्याच संस्कारातून आज संस्था इंग्रजी आणि मराठी माध्यमाची शाळा चालवत आहे. एम. एन. जोशी सरांनी निवृत्तीनंतरही शाळेकडे लक्ष ठेवले आहे. त्यांच्या पुण्याईमुळेच इंग्रजी माध्यमाच्या शाळेची इमारत उभी राहिलीली आहे. २०२१-२२मध्ये शाळेचा शताब्दी महोत्सव आहे. त्यानिमित्त शाळांमध्ये सुविधा देण्याचा संकल्प आहे.’

‘बोलण्यापेक्षा काम करून दाखवायला मला आवडते. शाळेसाठी देणगी मागताना आपण स्वतःसुद्धा योगदान दिले पाहिजे, असे मला वाटते. म्हणून मी ही देणगी दिली,’ असे जयंत प्रभुदेसाई म्हणाले.

या वेळी देणगीदार भक्ती पित्रे-नायर यांच्यासह सूरज नायर, आयनेश व ध्रुव नायर, श्री. प्रभुदेसाई यांच्या भगिनी उर्मिला नामजोशी व शरयू टिकेकर, कार्याध्यक्षा अॅड. सुमिता भावे, भक्ती पित्रे-नायर यांचे मामा वसंत धाक्रस, वृषाली धाक्रस, भाऊ वैभव धाक्रस आणि संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. विनय आंबुलकर, कौन्सिल सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. दाक्षायणी बोपर्डीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विश्वेश जोशी यांनी शाळेविषयी माहिती दिली. 

भक्ती पित्रे-नायर यांचा सत्कार करताना अॅड. बाबा परुळेकर
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link