Next
बँक ऑफ महाराष्ट्रच्या कार्यान्वयन नफ्यात वाढ
प्रेस रिलीज
Saturday, May 05 | 06:28 PM
15 0 0
Share this story

बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. मराठे यांनी बँकेचे आर्थिक निकाल जाहीर केले. या वेळी (डावीकडून) बँकेचे कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता, आर. पी. मराठे व  कार्यकारी संचालक ए. सी. राऊत.

पुणे : ‘उत्पन्नामध्ये वाढ आणि खर्चामध्ये कपात करण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे मार्च २०१८ च्या  अखेरीस मालमत्तेची गुणवत्ता, भांडवल पर्याप्तता आणि नफा अशा सर्व बाबींमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रने प्रगती केली असून, मार्च २०१८ तिमाही अखेरीस बँकेने कार्यान्वयन नफ्यामध्ये २८.३४ टक्के वाढ नोंदवली आहे.’ अशी माहिती बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. मराठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या चौथ्या तिमाही अखेर आणि वर्ष ३१ मार्च २०१८ समाप्तीचे आर्थिक निकाल जाहीर केले. त्या वेळी ते बोलत होते.

मराठे पुढे म्हणाले, ‘बँक आर्थिक स्थिती मजबुतीकरणाच्या प्रक्रियेमध्ये असून,व्यवसायामध्ये अधिक नफा मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना भांडवलाचा कार्यक्षम वापर करण्याबाबत आम्ही सुधारणा करत आहोत. प्राथमिकता ते किरकोळ (रिटेल) कर्जे, कृषी आणि सूक्ष्म-लघु-माध्यम उद्योग अशा वैविध्यपूर्ण कर्ज विभागावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहोत. उत्तम ग्राहक सेवा आणि आमच्या शेअरधारकांना चांगल्या परताव्याबाबत आम्ही योग्य कार्यकृती कार्यक्रम आखलेला आहे.’ 

‘३१ मार्च २०१८ रोजी वार्षिक आधारावर कार्यान्वयन नफा १९.९४ टक्क्यांनी वाढून, तो दोन हजार १९२ कोटी इतका झाला. गतवर्षी मार्च २०१७ मध्ये तो एक हजार ८२७ कोटी होता. ३१ मार्च २०१८ च्या तिमाही अखेरीस कार्यान्वयन नफा ५४६ कोटी झाला. मागील वर्षी मार्च २०१७ तिमाही अखेरीस कार्यान्वयन नफा ४२६ कोटी होता. ही वाढ २८.३२ टक्के इतकी आहे.  बँकेच्या ३१ मार्च २०१८ वर्ष अखेर कार्यान्वयीन खर्चामध्ये ५.३० टक्के  इतकी घट झाली. व्याजावरील खर्चावर घट होण्यासाठी सहाय्यकारी सिद्ध होणार्या् कासा दरामध्ये बँकेने नेहमीप्रमाणे वाढ दर्शवत उच्च प्रमाण राखले. हा दर ४७.७१ टक्के इतका झाला आहे. व्याजावरील खर्चामध्ये ३१ मार्च २०१८ वर्ष समाप्तीस गतवर्षीच्या ८ हजार ८२७ कोटीच्या तुलनेत १३.२८ टक्के  इतकी कपात होऊन हा खर्च ७ हजार ७०६ कोटी झाला.  ३१ मार्च २०१८  तिमाहीसाठी व्याजावरील खर्च मागील वर्षाच्या  तुलनेत १७.९३ टक्क्यांनी कमी होऊन १ हजार ११८ कोटी झाला. निव्वळ व्याज उत्पन्नात ३ हजार ३३८ कोटी झाले’, असेही मराठे यांनी स्पष्ट केले.

‘बँकेला ३१ मार्च २०१८ ला संपलेल्या वर्षात, डिसेंबर २०१७ अखेर, १हजार३७२.५१ कोटीच्या तुलनेमध्ये १ हजार१४५.६३ कोटी निव्वळ तोटा झाला आहे. आर्थिक वर्ष २०१८ च्या चौथ्या तिमाहीमध्ये बँकेस ११३.४९ कोटींचा निव्वळ तोटा झाला आहे’,असेही मराठे यांनी नमूद केले.

‘बँकेच्या एकूण व्यवसायात  तिमाही आधारावर २.१३ टक्के वाढ होऊन तो   दोन  लाख ३३ हजार ६२६ कोटींवर गेला असून, ३१ मार्च अखेर  ठेवी  एक लाख ३८ हजार ९८१  कोटी तर एकूण कर्जे ९४ हजार ६४५ कोटींची आहेत.  तर, भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण ३१मार्च अखेर  रोजी बेसल तीन अन्वये १०.८७ टक्के किमान  राहिले. आर्थिक वर्ष २०१७- १८दरम्यान बँकेने क्वाललिफाईड इन्टी व  ट्यूशनल प्लेनसमेंटच्या (क्यू‍आईपी) माध्यरमातून मार्केटमधून ३१३ कोटी भांडवल उभे केले. बँकेला भारत सरकारकडून ३ हजार १७३ कोटींच्या रकमेचे सहकार्य प्राप्त झाले आहे,’अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link