Next
‘ब्रेनमॅपिंग इंडिया’तर्फे आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद
ब्रेन फिजिओलॉजिस्ट डॉ. प्रशांत देशमुख यांचा पुढाकार
प्रेस रिलीज
Saturday, April 13, 2019 | 02:19 PM
15 0 0
Share this article:



पुणे : ‘ब्रेनमॅपिंग इंडिया फोरम क्लिनिकतर्फे मेंदूच्या क्रिया, मेंदूंच्या अंतर्गाची तपासणी आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा ३७१ रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिरांतर्गत ब्रेनमॅपिंग तपासणी ९० टक्के सवलतीच्या दरात करण्यात आली,’ अशी माहिती ब्रेन फिजिओलॉजिस्ट व न्युरो फिडबॅक फिजिअशन डॉ. प्रशांत देशमुख यांनी दिली.

हे शिबिर औंध येथील ब्रेनमॅपिंग इंडिया फोरम क्लिनिक येथे घेण्यात आले. या शिबिरांतर्गत अतिचंचलता (एडीएचडी), फिट येणे, फेफरे येणे (एपिलेप्सी), एकाग्रता शीघ्र संतापी, मतिमंदता अभ्यासात अडचणी येणार्‍या रुग्णांवर न्युरोफिडबॅक चिकित्सेवर उपचार करण्यात आले.

शिबिराविषयी बोलताना डॉ. देशमुख म्हणाले, ‘औषधोपचाराचे योग्य नियोजन केल्यास सुमारे ३० टक्के रुग्णांना लाभ झाल्याचे समोर आले आहे, तर १५ टक्के रुग्णांना स्वास्थ मिळाले आहे. अतिचंचलता, मिर्गी फिट, स्वमग्नता, निद्रानाश, चिंतारोग, डिप्रेशन, डोकेदुखी, अभ्यासातील समस्या, औषध किंवा मादक पदार्थाचे व्यसन, ट्रॉमा ब्रेन इन्जुरी (मेंदूची दुखापत) यावर नियंत्रण आले आहे; तसेच उपचारामुळे क्रियाशीलता वाढली, समस्या सोडविण्याची क्षमतेत वाढ झाली. आत्मबोध वागणूक सुधारली असून, विचार करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे.’

डॉ. प्रशांत देशमुख हे आंतरराष्ट्रीय न्युरोफिडबॅक रिसर्च सोसायटीचे सदस्य आहेत. त्यांनी एक हजार १९४ मुलांना अतिचंचलता, अतिक्रोध, एकाग्रता नसणे, अभ्यासातील अडचणींवर संशोधन करून १५ प्रबंध जागतिक संशोधन लेखामध्ये सादर केले आहेत. या अभ्यासाचा रुग्णांवर उपचार करताना लाभ होत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search