Next
भगवान परशुराम यात्रेचे रत्नागिरीत जल्लोषात स्वागत
‘ब्राह्मणांचे महासंघटन, हेल्पलाइन सुरू करणार’
BOI
Tuesday, February 19, 2019 | 02:43 PM
15 1 0
Share this storyरत्नागिरी :
‘देशातील दहा हजार गावांमधून, एक लाख ११ हजार किलोमीटर अंतर पार करणार असलेली अखंड भारत श्री परशुराम यात्रा ब्राह्मणांचे महासंघटन करत आहे. यातून ब्राह्मणांसाठी हेल्पलाइन सुरू केली जाणार असून, रोजगारसंधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत,’ अशी माहिती ब्रह्म परशुराम आखाड्याचे आचार्य राजेश्वर यांनी दिली. परशुराम यात्रेचे रत्नागिरीत मारुती मंदिर येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर अखिल चित्पावन ब्राह्मण संघाच्या आवारात आचार्यांनी यात्रेविषयी माहिती दिली.‘भगवान परशुरामांचा महिमा सांगण्यासाठी नेपाळ, भूतान, मॉरिशस या देशांतही यात्रा नेण्यात येईल. भारतात ११ कोटी ब्राह्मण असून, साऱ्यांमध्ये समन्वयाचे काम यात्रेनंतर सुरू होईल. भारतातील ही सर्वांत मोठी यात्रा असून तिचा नक्कीच विश्व्विक्रम होईल. भगवान परशुरामाच्या महिमेचा प्रचार करणे हा यात्रेचा उद्देश आहे. परशुरामांच्या समोर वेद व पाठीवर धनुष्यबाण होते. त्यामुळे त्यांनी अकारण क्रोध केला नाही. धर्मस्थापनेसाठी कार्य केले. पृथ्वीवरील सर्व ब्राह्मणांचे संघटन त्यांनी केले व पृथ्वीची सत्ता महर्षी कश्यप यांच्याकडे दिली. ब्राह्मणांच्या मान, सन्मानासाठी परशुराम हेच आराध्य दैवत आहे,’ असे त्यांनी सांगितले.

‘ब्रह्मवृंद परशुरामाचे वंशज आहेत. भारतात ब्राह्मणांची संख्या ११ कोटी आहे. गोत्र, संस्कृती, प्रदेशामुळे ते विभागले गेले आहोत; मात्र ऋणानुबंध जुळण्यासाठी ही यात्रा काम करणार आहे. प्रत्येक ठिकाणची नावे, माहिती, मोबाइल नंबर संकलित केले जाणार आहेत. त्यातून हेल्पलाइन काम करील,’ असे आचार्य राजेश्वर म्हणाले.‘परशुरामांनी यज्ञ करून शिवलिंग प्रतिष्ठापना केली, त्या लोहार्गल (झुंझुनू राजस्थान) तीर्थक्षेत्रातून यात्रेला सुरुवात झाली. देशभरातील ब्राह्मणांच्या उपस्थितीत कुरुक्षेत्रावर यात्रेचा समारोप होणार आहे. तिथून विशाल फेरी दिल्लीला रवाना होईल. आतापर्यंत २५०० गावांना भेटी देऊन ३८ हजार किलोमीटरची यात्रा झाली आहे,’ असेही आचार्यांनी सांगितले.

या वेळी चित्पावन ब्राह्मण संघाचे कार्यवाह राजेंद्र पटवर्धन, विश्वि ब्राह्मण महापरिषदेचे राष्ट्रीय महामंत्री प्रशांत शर्मा, दीपक जोशी, विनित फडके, श्रीपाद मराठे, राजू भाटलेकर, योगेश हळबे, विद्याधर ताम्हनकर, प्रथमेश रिसबूड, तेजराज जोग, जयंत आठल्ये, नितीन पंडित, सुनील मुळे, विश्वंनाथ केळकर, शैला मराठे, दीपक उकिडवे आदींसह अनेक जण उपस्थित होते.

 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
मकरंद About 22 Days ago
जय परशुराम, जय परशुराम, जय परशुराम 👍👍
0
0

Select Language
Share Link