Next
पुणे येथे डेक्कन क्लिनिकची सुरुवात
प्रेस रिलीज
Wednesday, April 04 | 05:46 PM
15 0 0
Share this story



पुणे : येथील डॉ. संजय देशमुख, डॉ. अनुपमा माने, डॉ. विश्वनाथ जिगजीन्नी, डॉ. सुजाइ हेगडे, डॉ. अमित मुळे, डॉ. शैलेश नाईक आणि डॉ. प्रसाद रहाते यांनी एकत्र येत  डेक्कन क्लिनिकची पुणे येथे सुरुवात केली आहे.  

टाटा मेमोरियल सेंटर मुंबईचे माजी संचालक, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या राकोचे माजी चेअरमन, रुरल कँसर सेंटरचे संस्थापक, आणि सध्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये सिनियर ओन्कॉलॉजीस्ट म्हणून कार्यरत असलेल्या पद्मभूषण डॉ. प्रफुल्ला देसाई यांच्या हस्ते डेक्कन क्लिनिकच्या पुण्यातील कामकाजाची अधिकृत घोषणा करण्यात आली. पुना क्लब येथे आयोजित केलेल्या या समारंभात डेक्कन क्लिनिकच्या स्थापनेमागील संकल्पना, उद्दिष्ट आणि ध्येय याची माहिती उपस्थितांना देण्यात आली.

वाढत चाललेले शस्त्रक्रियांचे दर, प्रामाणिक सल्ल्यांचा आणि योग्य शस्त्रक्रियांचा अभाव या काही मुख्य कारणांसाठी या सात डॉक्टर्सनी एकत्र आले आहेत. डेक्कन क्लिनिक म्हणजे योग्य सल्ला, योग्य खर्चाचे, तुमच्या सगळ्या वैद्यकीय गरजेचे एक उत्तम ठिकाण अशी सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

‘आमच्यासाठी रुग्ण हा प्रथम रुग्ण नसून तो एक माणूस आहे आणि त्याप्रकारेच आम्ही त्याला वागणूक देतो. आम्ही नैतिक पद्धतींवर विश्वास ठेवत असून, डोक्याने विचार करण्यापेक्षा हृदयाने निर्णय घेण्यास प्राधान्य देतो ज्याचा फायदा आमच्या रुग्णांना नक्कीच होतो,’ असे डॉ. हेगडे या वेळी बोलताना म्हणाले.

डेक्कन क्लिनिक येथे सर्वप्रकारच्या कॅन्सर शस्त्रक्रिया, प्लास्टिक, कॉसमेटीक् सर्जरी, ब्रेस्ट सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि सर्व शस्त्रक्रिया अत्याधुनिक टेक्नोलॉजीच्या सहाय्याने केल्या जातात. अनेक सुविधा या भारतात प्रथम वापरल्या जात आहेत.

क्लिनिकच्या वेळेविषयी :
दिवस : सोमवार ते शनिवार
वेळ : सकाळी १० ते रात्री आठ वाजता
स्थळ : ६०-६२, कनॉट पॅलेस, ग्राउंड फ्लोअर, बंड गार्डन रोड पुणे ४११ ००१.
संपर्क : (०२०) २६१६ ०२६६.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link