Next
डॉ. राजूरकर यांचे पुण्यात अणुऊर्जेवर व्याख्यान
प्रेस रिलीज
Tuesday, April 16, 2019 | 12:26 PM
15 0 0
Share this article:

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे संग्रहित छायाचित्र.पुणे : इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सचे पुणे केंद्र आणि मराठी विज्ञान परिषदेचा पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने परमाणु रसायनशास्त्रातील संशोधक डॉ. नीलिमा राजूरकर यांचे ‘अणुऊर्जा- मिथक आणि सत्य’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम आज (१६ एप्रिल) संध्याकाळी ६.१५ वाजता शिवाजीनगर येथील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सच्या केंद्रात होणार आहे.

आज भारताकडे सात हजार ७८० मेगावॅट क्षमतेचे सात अणुऊर्जा प्रकल्प आहेत. त्यातून ३५ टीडब्ल्यूएच ऊर्जेचे उत्पादन होते व तो एकूण विद्युत पुरवठ्याचा ३.२२ टक्के भाग आहे. औष्णिक वीज प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात कार्बन डायॉक्सिडचे उत्सर्जन होते; तसेच राख निर्माण होते. सौर व पवनऊर्जेला काही नैसर्गिक मर्यादा आहेत. अणुऊर्जेचे पर्यावणावर होणारे परिणाम अत्यंत कमी आहेत. दक्षिण कोरियात प्रामुख्याने अणुऊर्जेपासून वीजनिर्मिती होते. जगात सध्या अणूऊर्जा हीच योग्य आहे अशी समजूत रूढ होते आहे. परंतु भारतात अणुऊर्जेला भीतीपोटी विरोध केला जात आहे.

यातील मिथक काय व सत्य काय यावर परमाणु रसायनशास्त्रातील संशोधक डॉ. राजूरकर मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. राजूरकर या सावित्रीबाइ फुले पुणे विद्यापीठ मधील परमाणु रसायनशास्त्र विभागात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. या व्याख्यानाला विज्ञानप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्याख्यानाविषयी :
दिवस :
मंगळवार, १६ एप्रिल २०१९
वेळ : सायंकाळी ६.१५ वाजता
स्थळ : इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स, स. गो. बर्वे चौक, शिवाजीनगर पुणे ५.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search