Next
‘विशेष कॅम्प लावून प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न मार्गी लावा’
राज्य पुनर्वसन प्राधिकरण उपाध्यक्ष माधव भांडारीची सूचना
प्रेस रिलीज
Friday, October 12 | 03:59 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘पुणे विभागातील विविध प्रकल्पांत बाधित प्रकल्पग्रस्तांना केवळ कागदोपत्री अथवा एकतर्फी जमिनीचे वाटप न होता त्यांचे योग्य पद्धतीने शाश्वत पुनर्वसन होणे आवश्यक आहे. त्यासाठी बाधित गावात जिल्हा पुनर्वसन अधिकारी आणि यंत्रणा प्रकल्प अधिकारी यांनी विशेष कॅम्प लावून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासह सर्व प्रश्न मार्गी लावावेत,’ अशा सूचना महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा पुर्नस्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष आणि भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी केल्या.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पुणे विभागातील विविध प्रकल्पांतील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसंबंधी भांडारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, उपायुक्त (पुनर्वसन) दीपक नलावडे, कोल्हापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, सोलापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आर. टी. शिंदे यांच्यासह विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हा पुनर्वसन अधिकारी, यंत्रणा प्रकल्प अधिकारी यांच्यासह प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी उपस्थित होते.   

भांडारी म्हणाले, ‘विभागात असणाऱ्या सर्व पुनर्वसित वसाहतींचा रस्ते, पाणी, शाळा, ग्रामपंचायत इमारत, स्मशानभूमी, गटार या नागरी सुविधांचा आढावा घेऊन तो एका महिन्यात वस्तुनिष्ठपणे सादर करावा. पुनर्वसनाचे काम केवळ कागदोपत्री न होता खऱ्या अर्थाने पुनर्वसन होणे आवश्यक आहे. बाधितांना जमीनीबरोबरच त्यांच्या पुनर्वसन वसाहतीत सर्व नागरी सुविधांची पुर्तता करण्यात यावी. अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.’

बैठकीस पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link