Next
त्यांनी वाटले चक्क सुवर्णजडित पेढे...
BOI
Friday, September 07, 2018 | 05:27 PM
15 0 0
Share this article:

सुरेश पोकळेपुणे : आनंद साजरा करताना आपण पेढे, बर्फी किंवा यांसारखे गोड पदार्थ सर्वांना वाटतो, मात्र असा आनंद साजरा करताना जर कोणी चक्क सोनेजडित पेढे वाटले तर?? असे झालेले कधी पाहिले आहे का? पण हे खरे आहे. पुण्यातील सुरेश पोकळे यांनी आपला आनंद साजरा करताना चक्क सोन्याचे वर्ख असलेले पेढे वाटले आहेत. यासाठी त्यांनी मोठा खर्चही केला आहे.

व्यवसायाने शेतकरी असलेल्या सुरेश पोकळे यांनी स्वत:च्या कमाईतून एक कोटी १२ लाख रुपये किंमतीची ‘जग्वार-एक्स.  एल.’ ही महागडी कार खरेदी केली आहे. याचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी मोठा खर्चही केला आहे. सुरेश पोकळे यांनी स्वर्णजडित काम केलेले तीन किलो पेढे आपल्या आप्तेष्टांना वाटले आहेत. त्यांच्या या अनोख्या प्रकारामुळे त्यांचे कुटुंब तर चकित झालेच आहे, शिवाय त्यांच्या सर्व आप्तेष्टांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. 

आजवर कोणीही आपला आनंद साजरा करण्यासाठी अशा प्रकारचे पेढे वाटले नसावेत. हा मान सुरेश पोकळे यांनी मिळवला आहे. हे स्वर्णजडित पेढे त्यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध ‘काका  हलवाई’ यांच्या दुकानातून तयार करून घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. एक किलो पेढे तयार करण्यासाठी साधारण सात हजार रुपये इतका खर्च आला आहे. असे तीन  किलो पेढे पोकळे यांनी दुकानातून  खरेदी  केले आहेत. विशेष बाब म्हणजे अशा प्रकारचे पेढेही यापूर्वी कोणी तयार केले  नसून, हे पेढे आरोग्यासाठी खूप लाभदायी असल्याचे ‘काका हलवाई’चे मालक अविनाश गावडे यांनी सांगितले आहे.

‘हौसेला मोल नसते.. हे खरेच आहे. सुरेश पोकळे यांनी आपला हौस पूर्ण करण्यासाठीच कोट्यवधी रुपये किंमतीची जग्वार कार खरेदी  केली आणि  हजारो रुपये किंमतीचे स्वर्णजडित पेढेही वितरित केले आहेत’, अशा शब्दात काका हलवाईचे अविनाश गाढवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

(सुरेश पोकळे यांचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search