Next
रत्नागिरीत हळवे भातपीक पसवले
BOI
Friday, September 21, 2018 | 07:55 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी यंदा अद्याप चांगला पाऊस झालेला नसला, तरी कोकणात मात्र पाऊस चांगलाच बरसला आहे. गणेशोत्सव सुरू झाल्यापासून पावसाने दडी मारली असली, तरी तोपर्यंत चांगला पाऊस झाल्याने कोकणातील मुख्य पीक असलेल्या भाताच्या शेतीसाठी ते अनुकूल ठरले आहे. रत्नागिरी तालुक्यात भाताच्या हळव्या म्हणजेच कमी कालावधीत तयार होणाऱ्या जातींची लागवड केलेल्या शेतांमध्ये भाताच्या लोंब्या दिसू लागल्या आहेत. भातपीक पसवू लागल्यामुळे आणि अनुकूल वातावरणामुळे पिकाची वाढ चांगली झालेली दिसत असल्याने बळीराजा सुखावला आहे. 

गणेशोत्सवाच्या कालावधीत गावी आलेले चाकरमानीही हिरवी भातखाचरे पाहून आनंदित झाले. या वर्षी सुरुवातीपासून रत्नागिरी तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने भातलावणी वेळेत झाली. त्यानंतर आतापर्यंत चांगला पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यात भातपीक उत्तम आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सध्या ऊन-पाऊस असल्याने वातावरण भातशेतीला पोषक आहे. हळवी भातशेती पसवल्याने गणेशोत्सवानंतर लवकरच भातकापणी सुरू होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी तालुक्यात बहुतेक ठिकाणी शेतकरी शासनाकडून मिळणाऱ्या बियाण्याचा वापर करतात. काही भागांतील किरकोळ पाऊस वगळता पावसाने गेले पंधरा ते वीस दिवस दडी मारली आहे. उन्हाचा कडाकाही वाढला आहे. उशिरा तयार होणाऱ्या म्हणजे गरव्या भातशेतीला पाण्याची गरज आहे. यामुळे काही ठिकाणच्या भातशेतीला विहिरीतील पाण्याने सिंचन करावे लागत आहे. 

(भातशेतीची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत. भातशेतीत चित्र साकारण्याची कला अर्थात पॅडी आर्ट याबद्दल आणि पॅडी आर्टच्या पुण्यातील प्रयोगाबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा. भातशेतीचा सगळा प्रवास सांगणारी एक सुंदर कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link